
कला उत्सवामध्ये राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील नववी ते बारावीतील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. या सर्व कला प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांचा वैयक्तिक सहभाग असणार आहे.
कापडणे: माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमधील प्रतिभा ओळखून त्यांच्यामधील कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्यामार्फत कला उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 2020 -21 मध्ये केंद्र शासनाने कला उत्सवाच्या आयोजनामध्ये शास्त्रीय गायन, पारंपारिक गायन, शास्त्रीय संगीत, पारंपारिक लोकसंगीत, शास्त्रीय नृत्य, पारंपारिक लोकनृत्य, द्विमितीय चित्र, त्रिमितीय चित्र-शिल्प व खेळणी तयार करणे. या नऊ कला प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.
वाचा- पक्षीय विचारांवर शिक्कामोर्तब की नाते अन् हितसंबंध
कला उत्सवामध्ये राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील नववी ते बारावीतील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. या सर्व कला प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांचा वैयक्तिक(solo) सहभाग असणार आहे. कला उत्सव स्पर्धेबाबत http://www.kalautsav.in या वेबसाईटवरील सुचनांनुसार कलेचा चार ते सहा मिनिटांचा व्हीडीओ तयार करून 27 नोव्हेंबर पा वाजेपर्यंत पााठवायचा आहे. व्हिडिओ पोस्ट करताना विद्यार्थ्याने आपले नाव, इयत्ता, शाळेचा पत्ता, शाळेचा यु -डायस क्रमांक, तालुका, जिल्हा, मेल आयडी संपर्क क्रमांक व सहभाग घेत असलेला कलाप्रकार इत्यादींचा उल्लेख करायचा आहे.
व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर विद्यार्थ्यांने https://covid19.scertmaha.ac.in/kalautsav/ या वेबपोर्टलवर जाऊन नोंदणी करावी. नोंदणी केल्यानंतरच स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा सहभाग निश्चित होणार आहे.
व्हिडिओ प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक जिल्हास्तरावर परीक्षण समितीमार्फत व्हिडिओची तपासणी करून प्रत्येक जिल्ह्यातून नऊ कला प्रकारांमध्ये एक विद्यार्थी व एक विद्यार्थिनी अशा 18 सर्वोत्कृष्ट स्पर्धकांची नावे निश्चित करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठवण्यात येतील. येणार आहेत. राज्यस्तरावरील प्राप्त नामनिर्देशनामधून प्रत्येक कला प्रकारासाठी 1 विद्यार्थी व 1 विद्यार्थिनी अशी 18 नावे अंतिम करून राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड होणार आहे.
आवश्य वाचा- भाऊबीजला भावाची बहिणीसाठी अनोखी भेट; सतराव्यांदा रक्तदान
दरम्यान या स्पर्धेच्या माहितीबाबत मुख्याध्यापकांना माहिती पत्रक प्राप्त झाले आहेत. व्हीडीओ परीषदेद्वारेही मार्गदर्शन करण्यात येत आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे संयोजन करीत आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे