ऑनलाइन शिक्षणात शिक्षकांना सत्तावन्न कामे !

जगन्नाथ पाटील 
Tuesday, 10 November 2020

ग्रामीण भागातील शिक्षक थेट दारापर्यंत पोचत विद्यार्थ्यांना धडे देत आहेत. गृहपाठही नित्यनेमाने तपासत आहेत.

कापडणे  : राज्यात साडेसात महिन्यांपासून शाळांना सुटी आहे. मात्र शिक्षक शैक्षणिक विविध ५७ कामांमध्ये व्यस्त आहेत. यात ६० टक्के ऑनलाइन, ४० टक्के ऑफलाइन शिक्षणासाठी अविरत प्रयत्न केले. ग्रामीण भागातील शिक्षक थेट दारापर्यंत पोचत विद्यार्थ्यांना धडे देत आहेत. गृहपाठही नित्यनेमाने तपासत आहेत. या कामकाजाच्या अहवालाची चर्चा गुरुजनांसह पालकवर्गातही होऊ लागली आहे. 

आवश्य वाचा- पोलिस निरीक्षकाच्याच घरी चोरट्यांनी साधली `दिवाळी` ! 
 

शिक्षकांनी पार पाडलेली कामे 
कोरोना चेकपोस्ट नाक्यावर ड्यूटी करणे, ऑक्सिजन पुरवठा ड्यूटी करणे, कुटुंब सर्वेक्षण करणे, वार्षिक निकाल तयार करणे, पटनोंदणी, विद्यार्थी प्रवेश, प्रमोशन, शाळा सोडल्याचे दाखले तयार करणे, बदलीबाबत माहिती भरणे. यु-डायस सर्टिफाय करणे, दिव्यांग प्रोत्साहन, मदतनीस भत्ता वितरण, योग दिन साजरा करणे, जनगणना शिक्षक माहिती, दरमहा शिक्षण परिषद, शालेय पोषण आहारवाटप, अहवाल, शालेय व्यवस्थापन समिती दरमहा बैठक, गुगलमीट ऑनलाइन तास, ऑनलाइन पालक सभा, ऑनलाइन उपक्रम व स्पर्धा, व्हिडिओ, पीडीएफ तयार करणे, ऑनलाइन टेस्ट तयार करणे, रोटरी क्लबमार्फत प्रशिक्षण, शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण, विज्ञान जाणीवजागृती प्रशिक्षण, मैत्री गणित विज्ञानाशी, गोष्टीचा शनिवार, अध्ययन-अध्यापन अहवाल, बालरक्षक माहिती, बालकाचे हक्क व सुरक्षितता. 

 

ऑनलाइन प्रशिक्षण, इन्स्पायर अॅवॉर्ड माहिती, कोविड जनजागृती, कुटुंब फॉर्म भरणे, बेसलाइन टेस्ट सोडवणे, चार टक्के सादील ऑडिट, समग्र शिक्षा अभियान ऑडिट, मोफत पाठ्यपुस्तके वाटप, अल्पसंख्याक शिष्यवृत्ती, हात धुवा दिन, वाचन प्रेरणा दिन, बारदान विक्री भरणा, फेसबुक लाइव्ह मीटिंग, ऑनलाइन विज्ञान प्रशिक्षण, शैक्षणिक प्रक्रिया माहिती, स्थलांतर विद्यार्थी माहिती, थॅंक्स टीचर अभियान, रा. शै. धोरण स्पर्धा, विज्ञान किट वापर प्रशिक्षण.

वाचा- आगे आगे देखो, होता है क्या; शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्या भेटीनंतर चर्चेला उधाण
 

मुख्याध्यापक झूम मीटिंग, नवोपक्रम अहवाल लेखन, एक तास कोरोनासाठी जागृती, माझे कुटुंब-माझी जबाबदारी, ५० टक्के शाळेवर उपस्थिती, स्वाध्याय उपक्रम माहिती, कृतिपत्रिका माहिती, अॅनिमियामुक्त भारत, फटाकामुक्त दिवाळी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, नवोदय फॉर्म भरणे व शिष्यवृत्ती फॉर्म भरणे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news kapadne teachers have to do various things while teaching online