महिन्यापासून गाव हरवले रात्रीच्या अंधारात!

जगन्नाथ पाटील
Monday, 12 October 2020

स्र्टीट लाईट दुरुस्तीसाठी तात्काळ कर्मचार्‍यांना पाठविण्यात येईल. लवकरच बिघाडाचे निराकरण होईल.
गांगुर्डे, अभियंता धुळे ग्रामीण

कापडणे (धुळे) : पंचवीस हजार लोकवस्ती. गावाचा विस्तार तीन चौरस किमी आहे. स्र्टीट लाईट शंभरावर आहेत. हे लाइट तब्बल एक महिन्यापासून बंद आहेत. ग्रामस्थांना अंधारात चाचपडावे लागत आहे. रात्रीच्या अंधारात गाव हरवले आहे. स्र्टीट लाईट दुरूस्तीकडे विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारीही लक्ष देत नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.

स्र्टीट लाईटची दुरुस्ती होवून सुरु व्हावेत; यासाठी ग्रामपंचायत प्रशासन वारंवार विद्युत वितरण कंपनीच्या येथील कार्यालयात हेलपाटे मारीत आहे. संबंधित कनिष्ठ अभियंता कानावर हात ठेवून बसले आहेत. समस्या कोण सोडवेल, असा प्रश्न प्रशासनाकडूनच उपस्थित होत आहे. दरम्यान येथील काही युवकांनी सायंकाळी स्र्टीट लाईट सुरु होत नसल्याने निषेध व्यक्त केला.

महिनाभरापासून गाव अंधारात आहे. संबंधितांचे दुर्लक्ष हे अक्षम्य बाब आहे. कापडणे येथील सहाय्यक कनिष्ठ अभियंत्याचेही दुर्लक्ष व्हायला नको होते. अभियंता गांगुर्डे यांच्याशी बोलणे झाले आहे. लवकरच स्र्टीट लाईट सुरु होतील.
- बापू खलाणे, कृषी सभापती जि.प.धुळे 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news kapdane village one month no light