esakal | घरपट्टी पाणीपट्टीच्या थकबाकीने धुळे तालुक्यातील साठ गावांचा विकास खुंटला  
sakal

बोलून बातमी शोधा

घरपट्टी पाणीपट्टीच्या थकबाकीने धुळे तालुक्यातील साठ गावांचा विकास खुंटला  

गेल्या वीस वर्षांपासून वसुलीचे प्रमाण अवघे दहा ते बारा टक्यांवर आले आहे. यास स्थानिक राजकारणही जबाबदार आहे. वसुलीसाठी सरपंच व सदस्यच सहकार्य करीत नाही.

घरपट्टी पाणीपट्टीच्या थकबाकीने धुळे तालुक्यातील साठ गावांचा विकास खुंटला  

sakal_logo
By
जगन्नाथ पाटील

कापडणे : धुळे तालुक्यातील महसुली एकशे साठ गावांमधील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली होत असते. त्यातुन गावाचा विकासास चालना मिळते. पाणीपट्टीची 1कोटी 66 लाख 28 हजार 659 आणि घरपट्टीची 5 कोटी 76 लाख 30 हजार 858 एवढी थकबाकी आहे. एकूण 7 कोटी 42 लाख 59 हजार 517 एवढी वसुली करण्यात ग्रामपंचायत हतबल ठरत आहे. यातून गावाचा विकास चालना मिळत नसल्याचेही पुढे आले आहे.

धुळे तालुक्यात एकशे साठ महसुली गावे आहेत. स्वतंत्र ग्राम पंचायती असलेली गावे एकशे तीसवर आहे. उर्वरीत गावे गट ग्रामपंचायतीत आहेत. ग्राम विकासासाठी घर आणि पाणी पट्टी वसुली महत्वपुर्ण भूमिका बजावत असतात. मात्र गेल्या वीस वर्षांपासून वसुलीचे प्रमाण अवघे दहा ते बारा टक्यांवर आले आहे. यास स्थानिक राजकारणही जबाबदार आहे. वसुलीसाठी सरपंच व सदस्यच सहकार्य करीत नसल्याने थकबाकीचा आकडा फुगला आहे. वसुलीसाठी अद्यापही मोठे प्रयत्न होत नसल्याने नियमित कर भरणार्‍यांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

थकबाकी न भरणारेच मागतात सुविधा
खेडोपाडी गटातटाचे राजकारण फोफावले आहे. सत्ताधारी गटाच्या विरोधात विरोधक कर वसुलीला अडचण आणत असतात. तर जे नियमित कर भरत नाही. तेच अधिक सुविधांसाठी अधिक वाद निर्माण करीत असतात. वसुलीच्या बाबतीत ग्रामस्थांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे.

दरम्यान धुळे तालुक्यातील पंचायतींची थकबाकी साडेसात कोटींवर आहे. यास ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारीही जबाबदार आहेत. वसुली नियमित न करणार्‍या संबंधितांवर कारवाई करणेही आवश्यक असल्याचे चर्चिले जात आहे.

loading image