ना घंटा वाजली ना शाळा भरली तरी पाच दिवसांची मिळाली सुटी

जगन्नाथ पाटील
Thursday, 5 November 2020

आॅनलाईन अध्यापन किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचले, हे सर्वज्ञात आहे. दिवाळीनंतर शाळा सुरु होतील का, याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागून आहे.

कापडणे : राज्यात कोव्हीड-19 या महामारीच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या पररस्थितीत शाळा प्रत्यक्षात सुरू करणे शक्य झाल्या नाहीत.आॅनलाईन अभ्यासाचा दावा करीत, पहिले सत्र संपण्यात आले आहे. आता दिवाळी सुटी मिळावी म्हणून विविध शिक्षक संघटनांचा आग्रह सुरु होता. यास दुजोरा देत बारा ते सोळा नोव्हेंबर अशी पाच दिवसांची सुटी राज्यशासनाने घोषीत केली आहे.  त्यामुळे ना घंटा वाजली ना शाळा भरली, तरीही राज्य शासनाने पाच दिवसांची सुटी जाहिर केली आहे. 

आवश्य वाचा- महाराष्ट्रात प्रथम सीसीआय कापूस केंद्र सुरू होण्याचा मान शिंदखेडयाला !
 

दरम्यान कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे पहिले सत्र वाया गेले आहे. आॅनलाईन अध्यापन किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचले, हे सर्वज्ञात आहे. दिवाळीनंतर शाळा सुरु होतील का, याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागून आहे.

शाळा सुरु करण्याचे अधिकार स्थानिक प्राधिकरणाचेच
कोरोना प्रादुर्भावाची परीस्थिती सुधारणा होत आहे. परीस्थितीनुसार प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, महानगर पालिका आयुक्त व शाळा व्यवस्थापन समिती यांना दिले आहेत. 

...होय आॅनलाईन अध्यापनाला सुट्टी 
76 दिवसांपेक्षा अधिक दिल्या जात नाहीत. पहिली ते पाचवीच्या वर्गासाठी शैक्षणिक कामाचे दिवस दोनशे आणि सहावी ते आठवीचे दोनशे वीस दिवस असतात. बारा ते सोळा नोव्हेंबर हा दिवाळीचा कालावधी आहे. हे पाच दिवस 
आॅनलाईन अध्यापनास सुटी घोषीत झाली आहे. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news kapdne equest of the teachers' union, the government has given five days leave to the teachers