महाराष्ट्रात प्रथम सीसीआय कापूस केंद्र सुरू होण्याचा मान शिंदखेडयाला !

विजयसिंह गिरासे 
Thursday, 5 November 2020

सीसीआयचे कापूस केंद्र महाराष्ट्र प्रथम केंद्र सुरू करण्याचा मान शिंदखेडा तालुक्याला मिळाला. गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात शेवटचे केंद्र बंद शिंदखेडा तालुक्यात झाले होते.

चिमठाणे : शिंदखेडा तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी हा शेतातील कापूस वेचनी ते थेट सी सी आय केंद्र पर्यंत आणून विकू शकतो. राज्यात सी.सी.आय केंद्र प्रथम सुरू होण्याचा मान शिंदखेडा तालुक्याला मिळाला असे आमदार जयकुमार रावल यांनी बुधवारी सकाळी साडे आकरा वाजता शिंदखेडा येथील सीसीआय केंद्राच्या उदघाटना प्रसंगी केले. 

वाचा- पंधरा दिवसांवर होता मुलीचा विवाह; तत्‍पुर्वीच दुःखाचा डोंगर, वडिलांनी फोडला हंबरडा

शिंदखेडा येथील रेल्वे स्टेशन जवळील वर्धमान जिनींग येथे आज सीसीआय कापूस केंद्राचे उदघाटन माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य कामराज निकम, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र देसले, शिंदखेडा नगरपंचायतीचे गटनेते अनिल वानखेडे, दोंडाईचा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष विक्रम पाटील, तहसीलदार सुदाम महाजन, पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी, ग्रेडर आदित्य वामन, शिंदखेडा पंचायत समितीचे उपसभापती नारायणसिंह गिरासे, माजी जिल्हा सदस्य जयसिंह गिरासे, बाजार समितीचे संचालक जगतसिंह गिरासे, सर्जेराव पाटील, मोतीलाल पाटील, सुनील पवार, सखाराम पाटील, जिल्हा परिषद सदस्य पकंज कदम, नगरसेवक प्रकाश देसले, बाळासाहेब गिरासे, दिपक चौधरी, शिंदखेडा पंचायत समितीचे माजी सभापती जिजाबराव सोनवणे, भारतीय जनता पक्षाचे शिंदखेडा तालुका आध्यक्ष प्रा.रविंद्र खैरणार ,वर्धमान जिनिंगचे संचालक रमेश टाटीया, दोंडाईचा नगरपालिकेचे बांधकाम सभापती निखिल जाधव, परसामळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दिवानसिंह गिरासे, सुलवाडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रल्हाद भदाणे, सुभाष माळी, बाजार समितीचे सचिव पंडित पाटील, उपसचिव राजेंद्र पाटील, आप्पाराव पाटील , कार्यक्रमचे सुञसंचालन व आभार डी.एस.गिरासे यांनी मानले तर कार्यक्रमाचे प्रस्तावीक बाजार समितीचे सभापती तथा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्याक्ष नारायण पाटील यांनी केले. 

आमदार रावल म्हणाले की, सीसीआयचे कापूस केंद्र महाराष्ट्र प्रथम केंद्र सुरू करण्याचा मान शिंदखेडा तालुक्याला मिळाला. गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात शेवटचे केंद्र बंद शिंदखेडा तालुक्यात झाले होते. गेल्या वर्षी तालुक्यात एकूण तीन लाख 28 हजार टन कापूस खरेदी करण्यात आला. एकूण सुमारे 161 कोटीचा कापूस खरेदी करण्यात आला होता. केद्रांचे कृषी धोरणामुळे शेतकरी कोठे माल विकू शकतो. काही दिशाभूल केले जात आहे. वेचनी ते विक्री करू शकतो. तालुक्यात सिंचनामुळे ऊस तर पिकतो तर येत्या काळात द्राक्ष पिकणार आहे. नरडाणा येथील वंडर सिमेंट कंपनी झालेल्या तोडफोड प्रकरणी निषेध ही आमदार रावल यांनी केला.

ऑनलाईन कापूस नोंदणी का केली? शेतकरयांची नाराज !
तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरयांनी ऑनलाईन नोंदणी करण्याचे अहवान दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीने 23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर पर्यंत दोंडाईचा बाजार समीतीच्या मुख्य कार्यलयात 2850 व शिंदखेडा येथील उपबाजार येथे 5006 असे एकूण 7856 शेतकरयांनी नोंदणी केली होती. एका शेतकरयाला सात बारा व खाते उतारा तलाठीच्या सही शिक्का, आधार कार्ड व बॅक पासबुकांची झेराॅक्स जोडणे आवश्यक असल्याने एका शेतकरयांने 200 रूपये खर्च केला होता. माञ आज बाजारात समितीच्या आवारात जे वाहने येथील क्रमांका नुसार मोजले जातील असे सभापती नारायण पाटील यांनी जाहीर केल्या नंतर शेतकरयांनी नाराजी व्यक्त केली. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shindkhede first CCI cotton center in maharashtra started at Shindkheda