कुंभार समाजाचे राज्यातील पहिले तंत्रज्ञानयुक्त क्लस्टर ममदापूरला 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 22 August 2019

येवला : पारंपरिक पद्धतीने कुंभार समाज काम करत आहेत.मात्र आता लोक नक्षीकाम,कोरीव काम तसेच सुबक मूर्ती तसेच वेगवेगळे मातीचे भांडयांची मागणी करत आहेत.त्यामुळे काळाबरोबर बदलण्यासाठी समाजाने पुढे येऊन अद्ययावत मातीकाम करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी ममदापूर येथे सुमारे ५ कोटीचे तंत्रज्ञानयुक्त पहिले कुंभार क्लस्टर होणार आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी येथे क्लस्टर मार्गदर्शन मेळावा झाला.

येवला : पारंपरिक पद्धतीने कुंभार समाज काम करत आहेत.मात्र आता लोक नक्षीकाम,कोरीव काम तसेच सुबक मूर्ती तसेच वेगवेगळे मातीचे भांडयांची मागणी करत आहेत.त्यामुळे काळाबरोबर बदलण्यासाठी समाजाने पुढे येऊन अद्ययावत मातीकाम करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी ममदापूर येथे सुमारे ५ कोटीचे तंत्रज्ञानयुक्त पहिले कुंभार क्लस्टर होणार आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी येथे क्लस्टर मार्गदर्शन मेळावा झाला.

अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या वतीने नियोजित क्लस्टरच्या सविस्तर माहितीसाठी मार्गदर्शन मेळावा झाला. संस्थापक अध्यक्ष मोहन जगदाळे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे अखिल भारतीय प्रजापती महासंघ मातीकला सेल अध्यक्ष दत्ता डाळजकर होते.येथे मोठ्या प्रमाणात कुंभार समाजाची संख्या असून आता समाजाने मागणीप्रमाणे पुरवठा केला तरच पुढील पिढी कुंभार काम करेल अन्यथा व्यवसाय नामशेष होऊ शकतो.त्यासाठी महाराष्ट्रभरातील कुभारांनी या कामासाठी संघटना उभारली असून त्या संघटनेच्या माध्यमातून येथे भव्य क्लस्टर करण्यात येणार असल्याचे यावेळी जगदाळे यांनी सांगितले.

प्रदेश अध्यक्ष श्यामशेठ राजे,राज्य सचिव मनोहर जाधव,साईनाथ सोनावळे,राजेंद्र सावंदे, प्रदेश कार्यअध्यक्ष रंगनाथ सुर्यवंशी,सोमनाथ सोनवणे आदींनी मार्गदर्शन केले.नाशिक विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर भागवत,नरेंद्र कलंकार,जिल्हाध्यक्ष कृष्णा सोनवणे,संतोष सोनवणे,कीरण शिकारे,येवला तालुकाध्यक्ष नंदु सोनवणे,अरूण भागवत,प्रकाश चव्हाण,निलेश सोनवणे,दत्ता अष्टेकर,अंबादास गारे,प्रल्हाद सुर्यवंशी,माणिकराव रसाळ,राजेंद्र रोकडे,विलास जगदाळे,सुनिल सिरसाट,वाल्मीक सिरसाट, गोरख सिरसाट,दादासाहेब सिरसाट,शिवाजी सिरसाट,रविंद्र सिरसाट,अविनाश सिरसाट,अनिल सिरसाट, दत्ता सिरसाट,आरती सिरसाट,गणेश सिरसाट,राजेंद्र सिरसाट,बाळु सिरसाट,मारूती सिरसाट,नवनाथ सिरसाट,अतिष सिरसाट आदि उपस्थित होते. सुत्रसंचलन राजेंद्र सावंदे यांनी केले.

“कुंभार समाजाचे क्लस्टर महाराष्ट्रात कुठेच नाही तर गुजरात मध्ये चार ठिकाणी आहे.येथे होणारे क्लस्टर पहिले असून खादीग्राम उद्योगचे अधिकारी पाहणी करण्यास येणार आहे.निधीसाठी समाजाला 10 लोकवर्गणी भरायची आहे. ममदापूर येथील कारागिरांना मागील महिन्यात खादी ग्रामउद्योग यांच्यावतीने 10 इलेक्ट्रिक चाके प्रशिक्षण देऊन वाटप करण्यात आले आहे.”
-कृष्णा सोनवणे,जिल्हाध्यक्ष,कुंभार समाज विकास संस्था


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news kumbhar samaj andolan