esakal | गॅस पाईपलाईनसाठी "एमएनजीएल'ला 26 किलोमिटरपर्यत खड्डे खोदण्यास मंजुरी 
sakal

बोलून बातमी शोधा

residentional photo

गॅस पाईपलाईनसाठी "एमएनजीएल'ला 26 किलोमिटरपर्यत खड्डे खोदण्यास मंजुरी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक- शहरात थेट पाईपलाईनच्या माध्यमातून घरगुती सिलिंडर गॅस पुरविण्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमीटेड कंपनीला 26 किलोमीटर लांबीची पाईलपाईन टाकण्यासाठी मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून बांधकाम विभागाकडे रस्ता खोदण्याची परवानगी मागण्यात आली आहे. भविष्यात शहराच्या वाढत्या गर्दीत गॅससाठी भुमिगत पाईपलाईन टाकण्यास अडचण येण्याची शक्‍यता गृहीत धरून परवानगी मागण्यात आली आहे. 

नाशिक शहराचा विस्तार वाढतं असताना शहरात ड्रेनेज, रस्ते, सार्वजनिक वाहतुक व्यवस्था बळकट करण्यासाठी पायाभुत सुविधा पुरविल्या जात आहे. त्याचप्रमाणे शहरातील वाढती रहदारी व घरांचा विकास लक्षात घेता भविष्यात प्रत्येक घरात गॅसजोडणी देणे शक्‍य व्हावे म्हणून त्यापुर्वीचं पाईपलाईन टाकणे गरजेचे असून महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीच्या वतीने यापुर्वी महापालिकेला जागेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

   विल्होळी नाका येथील जागेच्या भाड्यावरून वाद सुरु होता. त्यावर तोडगा निघाल्यानंतर पंधरा वर्षांच्या कराराने विल्होळी जकात नाक्‍याजवळील जलशुद्धीकरण केंद्रांची सहा हजार चौरस मीटर जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला. आता पुढील टप्त्यात गॅस वितरणासाठी वाहीनी टाकणे गरजेचे असल्याने महाराष्टॅ नॅचरल गॅस कंपनीच्या वतीने महापालिकेकडे 26 किलोमीटरचे रस्ते खोदण्यासाठी परवानगी मागण्यात आली आहे. सहा विभागात 26 किलोमीटरचे खड्डे खोदण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे. आचारसंहिता लागु होण्यापुर्वी हि कारवाई केली जाणार आहे

loading image
go to top