esakal | किलो वॅट ऐवजी यापुढे किलो व्होल्टनुसार विज बिल 
sakal

बोलून बातमी शोधा

residentional photo

किलो वॅट ऐवजी यापुढे किलो व्होल्टनुसार विज बिल 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिकः महावितरणच्या उच्चदाब व 20 किलो वॅट वरील औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांसाठी पुढील काळात किलो व्होल्ट अँपीयर अवर बिलींग प्रणाली प्रस्तावित करण्यात आली आहे. राज्यात 1 एप्रिल 2020 पासून सुरु होणाऱ्या या प्रणालीसाठी तसेच ग्राहकांच्या सोयीसाठी अनुरूप असलेले मीटर लावण्याची पहिल्या 

टप्यातील प्रकिया नाशिक शहरासाठी 3628 मीटर बदलले जाणार आहे. 
उच्चदाब आणि 20 किलो वॅट पेक्षा जास्त भार असलेल्या ग्राहकांसाठी सोयीच्या असलेल्या किलो व्होल्ट अँम्पीयर (kVAh) बिलींग प्रणालीचा मुख्य उद्देश हा ग्राहकांनी पॉवर फॅक्‍टर 1 ठेवावा, जेणेकरून वितरण हानी कमी होईल व विजेचा दर्जा वाढून उच्चत्तम गुणवत्तेची वीज मिळेल हा आहे. या प्रणालीत जास्त रिऍक्‍टीव्ह पॉवर वापरणाऱ्या ग्राहकांना जास्त बिल भरावे लागणार असल्याने ग्राहकांना कमीत कमी रिऍक्‍टीव्ह पॉवर वापरण्यासाठी ही प्रणाली प्रोत्साहीत करणारी आहे. याशिवाय या प्रणालीत प्रोत्साहन व दंड शुल्क वेगळी लावण्याची गरज नाही.असे वीज वितरण कंपनीच्या सूत्रांचा दावा आहे. 

महावितरणच्या व्यवस्थापन प्रणालीत बदल करतांना कंपनीने के.व्ही.ए.एच. बिलींग प्रणाली सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांसाठी संपूर्णपणे नविन असलेल्या या प्रणालीबाबत ग्राहकांच्या माहीतीसाठी राज्यभर मंडळनिहाय शिबीर घेतली जाणार आहेत. नव्या बिलींग प्रणालीबाबत ग्राहकांना प्रश्नांचे उत्तरे देऊन शंकाचे निरसनही करण्यात येणार आहे. 

नाशिक शहर मंडळात एजन्सी नेमण्यात येऊन या प्रणालीकरिता अनुरूप विद्युत मीटर लावण्याची प्रकिया सुरु झाली असून पहिल्या टप्यात ऑक्‍टोबरपर्यंत 3628 मीटर बदलण्यात येणार आहेत. 
-प्रवीण दरोली (अधिक्षक अभियंता शहर ) 

loading image
go to top