esakal | जैताणे येथे बस-ट्रकचा भीषण अपघात; एक ठार, 29 प्रवासी जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

जैताणे येथे बस-ट्रकचा भीषण अपघात; एक ठार, 29 प्रवासी जखमी

अपघात इतका भीषण होता की बस व ट्रकच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला होता. बसचालक उशिरापर्यंत बसमध्ये अडकल्याने मदतकार्यात अडथळा येत होता.

जैताणे येथे बस-ट्रकचा भीषण अपघात; एक ठार, 29 प्रवासी जखमी

sakal_logo
By
भगवान जगदाळे

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) शिवारातील साईबाबा मंदिराजवळ साक्री-नंदुरबार महामार्गावरील एका वळणावर आज दुपारी बाराच्या सुमारास बस-ट्रकचा भीषण अपघात झाला. या घटनेत एक पन्नसवर्षीय प्रौढ महिला ठार झाली, तर सुमारे 29 जण जखमी झाले.

आवश्य वाचा- आओ जाओ घर तुम्हारा ! धुळे महापालिकेतील स्थिती

पिंपळगाव डेपोची बस नाशिकहून नंदुरबारकडे येत होती. मालवाहतूक ट्रक नंदुरबारहून साक्रीकडे येत होता. अपघात इतका भीषण होता की बस व ट्रकच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला होता. बसचालक उशिरापर्यंत बसमध्ये अडकल्याने मदतकार्यात अडथळा येत होता. बसमधील इतर जखमींना तातडीने जैताणे आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथून प्रथमोपचारानंतर संबंधितांना पुढील उपचारार्थ ताबडतोब नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर बसचालकाला धुळे जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले. जैताणे आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका आधीच नंदुरबार येथे गेल्याने साक्री व दहीवेल येथून तातडीने दोन रुग्णवाहिका मदतीसाठी बोलाविण्यात आल्या. वैद्यकीय अधीक्षक डॉ.हर्षवर्धन चित्तम यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोल पवार, डॉ.अभिषेक देवरे, डॉ.मितेश गवळे, डॉ.महेश ठाकरे, डॉ.मुकेश रेलन, डॉ.दशपुते यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांनी तत्पर सेवा दिली. 

पोलिस मदतीला धावले

दरम्यान घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. निजामपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सचिन शिरसाठ त्वरित पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सुमारे तासाभरात वाहतूक सुरळीत केली. बसमध्ये फसलेल्या बसचालकाला काढण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने मोठी कसरत करावी लागली. सायंकाळपर्यंत दोन्ही अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने हटविली जाणार असून तात्पुरती वाहतूक सुरळीत केल्याची माहिती एपीआय शिरसाठ यांनी दिली.

वाचा- धुळ्यात जलवाहिन्यांसाठी निधी द्या; पाणीपुरवठा राज्यमंत्र्यांकडे मागणी 

ग्रामस्थांचे माणसुकीचा प्रयत्न

स्थानिक ग्रामस्थांनीही मदतकार्यात खूप मोठी तत्परता दाखविल्याने संकटकाळी माणुसकीचा प्रत्यय आला. मयतात एका प्रौढ महिलेचा समावेश असल्याचे समजते. बसचालक व वाहकासह एकूण 30 प्रवाशांपैकी 1 महिला मयत असून 29 जखमींपैकी 6 जणांना प्रथमोपचारानंतर घरी सोडण्यात आले. तर उर्वरित 23 पैकी 22 जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात, तर 1 जखमी बसचालकास धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image