esakal | नंदूरबार जिल्ह्याला दहा हजार रेमडेसिव्हिरचा साठा द्यावा 
sakal

बोलून बातमी शोधा

नंदूरबार जिल्ह्याला दहा हजार रेमडेसिव्हिरचा साठा द्यावा 

मुंबई येथील तीन आणि लातूर येथील एक डॉक्टर नंदुरबार येथील स्थानिक रहिवासी असून, येथे सेवा देण्यासाठी इच्छुक आहेत.

नंदूरबार जिल्ह्याला दहा हजार रेमडेसिव्हिरचा साठा द्यावा 

sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार ः कोरोनावर उपचारांसाठी आवश्यक रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा तुटवडा भासत असल्याने दहा हजार इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून देण्याची विनंती आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी अन्न आणि औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे यांना पत्राद्वारे केली आहे. 

आवश्य वाचा- धुळ्यात ‘ते’ व्हेंटिलेटर सुरू होण्याची प्रतीक्षा; आरोग्यमंत्र्यांनी ‘सिव्हिल’ला दिलेली मुदत उलटली
 


जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने उपचारासाठी डॉक्टर आणि रुग्णांकडून रेमडेसिव्हिरची मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे. या औषधाचा शासकीय व खासगी रुग्णालयांना गरजेनुसार पुरवठा व्हावा यासाठी जिल्ह्याला दहा हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शन द्यावीत, असे पत्रात नमूद केले आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता २०० बेड्स वाढविण्याचे नियोजन असून, त्यासाठी आवश्यक तज्ज्ञ डॉक्टरांचे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी पालकमंत्री ॲड. पाडवी यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी सहा एमडी आणि चार अॅनेस्थेशिया तज्ज्ञांची गरज आहे. मुंबई येथील तीन आणि लातूर येथील एक डॉक्टर नंदुरबार येथील स्थानिक रहिवासी असून, येथे सेवा देण्यासाठी इच्छुक आहेत. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवरील ताण लक्षात घेता दोन महिन्यांसाठी या डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून द्यावी, असे पत्रात नमूद केले आहे. 

आवर्जून वाचा- डोक्‍यात गोळ्या घालून प्रौढाची आत्‍महत्‍या  


कोविड केअर सेंटरसाठी पाच कोटींची मागणी 
जिल्ह्यात तळोदा येथे ५०, नवापूर येथे ५०, नंदुरबार येथे १०० आणि शहादा येथे १०० ऑक्सिजन बेड्सची सुविधा असलेल कोविड केअर सेंटर सुरू होणार असून, आवश्यक सुविधांची निर्मिती व इतर आनुषंगिक बाबींसाठी पाच कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी पालकमंत्री ॲड. पाडवी यांनी मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे. जिल्‍ह्यातील कोविड विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता अधिकच्या सुविधा निर्माण करणे गरजेचे असल्याचे पत्रात नमूद केले आहे.  

संपादन- भूषण श्रीखंडे
 

loading image