esakal | मदत करण्याऐवजी ठाकरे सरकारच्या केवळ हवेतच घोषणा-आशिष शेलार
sakal

बोलून बातमी शोधा

BJP MLA Ashish Shelar

भाजपतर्फे राज्यभर संघटनात्मक कामासाठी आमदारांसोबत संवाद कार्यक्रम सुरू आहेत. त्यानिमित्त आमदार शेलार नंदुरबारला आले होते.

मदत करण्याऐवजी ठाकरे सरकारच्या केवळ हवेतच घोषणा-आशिष शेलार

sakal_logo
By
टीम ई सकाळ


नंदुरबार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी ११ हजार ५०० कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची घोषणा करत आपला शब्द फिरविला. राज्यातील पूरग्रस्तांना तातडीने (Flooded Help) मदत करण्याऐवजी ठाकरे सरकार हवेत घोषणा करत आहे, असा आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार ( BJP MLA Ashish Shelar) यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला.

हेही वाचा: धुळे जिल्ह्यावर पाणी संकट; धरणांमध्ये केवळ २५ टक्केच साठा


भाजपतर्फे राज्यभर संघटनात्मक कामासाठी आमदारांसोबत संवाद कार्यक्रम सुरू आहेत. त्यानिमित्त आमदार शेलार नंदुरबारला आले होते. जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन संघटनात्मक चर्चा व मार्गदर्शन केले. पत्रकारांशी बोलताना आमदार शेलार म्हणाले, की राज्यात बिकट परिस्थिती असताना ठाकरे सरकार मंत्रालयापर्यंत पोचलेले नाही. त्यामुळे ते दुर्गम भागात काय पोचणार. नंदुरबार जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट आहे. त्यात बँका शेतकऱ्यांना पीककर्ज देत नाहीत. दुष्काळसदृश स्थिती असताना नंदुरबारचे पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पूर्वतयारीची आढावा बैठक घेणे आवश्यक असतानाही पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी दुर्लक्ष केले आहे.

हेही वाचा: नंदुरबार जिल्ह्यात लसीकरणाने ओलांडला पाच लाखांचा टप्पा

केवळ हवेत घोषणा..

पुढे बोलतांना आमदार शेलार म्हणाले, की आदिवासी बांधवांना देण्यात आलेले खावटी किट निकृष्ट दर्जाचे आहे. लोकप्रिय सरकार असल्याचा ढोल वाजणारे नागरिकांसाठी कधी काम करतील, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक हे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. राज्यातील पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्याऐवजी ठाकरे सरकार हवेत घोषणा करत आहे. गेल्या दीड वर्षात आघाडी सरकारने राज्यात टाळेबंदी केली. त्यांचे अनलॉकबाबतचे निर्बंध काय आहे, तेच कळत नाही. राज्यात सर्वाधिक कुपोषणाचा प्रश्‍न नंदुरबारमध्ये गंभीर असताना अधिवेशनात यावर चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र, आघाडी शासनाने तसे न करता समांतर विधानसभा चालविली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी भाजपतर्फे प्रयत्न केले जातील, असे आश्‍वासनही त्यांनी दिले. आमदार राजेश पाडवी, प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, जिल्हाध्यक्ष श्री. चौधरी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेंद्रकुमार गावित आदी उपस्थित होते.

loading image
go to top