धुळे जिल्ह्यावर पाणी संकट; धरणांमध्ये केवळ २५ टक्केच साठा

Dhule Water Crisis News: धुळे जिल्ह्यात १२ मध्यम व ४७ लघुप्रकल्प आहेत. प्रकल्पांची क्षमता ४९४. ८६ दशलक्ष घनमीटर पाणी एवढी आहे.
Water
WaterWater
Summary

गतवर्षी आजच्या दिवसापर्यंत २४२८ मिलिमीटर पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण खूपच कमी असल्याने चिंता वाढली आहे.


सोनगीर : पावसाळा (Rain) निम्मा संपत आला मात्र धुळे जिल्ह्यात लघू व मध्यम प्रकल्पात पाण्याचा (Dam Water) उपयुक्त साठा अवघा २५.१४ टक्के असून पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. गतवर्षी या काळात ४६.१० टक्के जलसाठा (water Reservoir) होता. त्यामुळे पाण्याची यंदाची ही स्थिती फारशी चांगली म्हणता येणार नाही.

Water
नंदुरबार जिल्ह्यात लसीकरणाने ओलांडला पाच लाखांचा टप्पा


जिल्ह्यात लघू व मध्यम प्रकल्पात सध्या १२४.३९३ दशलक्ष घनमीटर एवढाच जलसाठा आहे. जूनपासून आजपर्यंत केवळ ८३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी आजच्या दिवसापर्यंत २४२८ मिलिमीटर पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण खूपच कमी असल्याने चिंता वाढली आहे. धुळे जिल्ह्यात १२ मध्यम व ४७ लघुप्रकल्प आहेत. प्रकल्पांची क्षमता ४९४. ८६ दशलक्ष घनमीटर पाणी एवढी आहे. लघु प्रकल्पांची जलसंचयन क्षमता १२१.९७ दशलक्षघन मीटर एवढी असताना अवघा १८.९८५ दशलक्षघनमीटर म्हणजे १५.५७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मध्यम प्रकल्पाची जलसंचयन क्षमता ४७१.४३ दशलक्ष घनमीटर असून सध्या १०५.४०८ दशलक्षघनमीटर म्हणजेच २८.२७ टक्के जलसाठा आहे.


धुळे जिल्ह्यातील १२ प्रकल्पांपैकी सर्वांत जास्त २५.७९ दलघमी जलसाठा सुलवाडे प्रकल्पात आहे. तर सर्वांत कमी ०.२३ दशलक्षघनमीटर जलसाठा सोनवद प्रकल्पात अवघा १.६० टक्के जलसाठा आहे. बहुतांश लघु प्रकल्पात अत्यल्प जलसाठा आहे. ४७ पैकी सर्वच लघु प्रकल्पात कमी जलसाठा असून काही पावसाळ्यातही कोरडे पडले आहेत. परिसरातील जामफळ, सोनवद, देवभाने, सातपायरी धरणात अत्यल्प साठा आहे. पावसाळ्याच्या उर्वरित काळात चांगला पाऊस झाल्यास प्रकल्प भरतील.

Water
जळगावच्या सर्व तालुक्यांत कोरोनाचे नव्या रुग्णांची नोंद नाही


प्रकल्पनिहाय जलसाठा
प्रकल्प, उपलब्ध जलसाठा व टक्केवारी (आकडेवारी दलघमीमध्ये)

१)पांझरा - १६.३४ ४५.८६
२)मालनगाव - २.२६ १९.९५
३) जामखेडी - ५.९५ ४८.२२
४)कनोली - १.६८ १९.८८
५)बुराई - ३.०९ २१.७५
६)करवंद - ३.३८ १८.५१
७)अनेर - १४.४९ २८.८०
८)सोनवद - ०.२३ १.६०
९)अमरावती ७.१० ३३.४१
१०)अक्कलपाडा - १४.३७ १६.१८
११)वाडीशेवाडी - ११.०३ ३२.५२
१२)सुलवाडे - २५.७९ ३९.६४
एकूण मध्यम प्रकल्पात - १०५.४०८ २८.२७
एकूण लघु प्रकल्पात - १८.९८५ १५.५७
एकूण जलसाठा. १२४.३९३ २५.१४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com