अधिकाऱ्यांचा व्हॉटस्‌ॲप ग्रुप अन्‌ अश्‍लील चित्रफीत व्हायरल 

धनराज माळी
Thursday, 29 October 2020

स्‍मार्टफोनमुळे सर्व काम सोपे होत चालले आहेत. याचा उपयोग म्‍हणून प्रत्‍येक शासकिय कार्यालयात वरिष्‍ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांचे व्हॉटस्‌ॲप ग्रुप तयार करून एकाच वेळी सर्वांना सुचना किंवा आदेश देण्यासाठी संदेश पाठविले जातात. परंतु, या ग्रुपवर अश्‍लिल चित्रफित व्हायरल होण्याचा प्रकार नंदुरबार जिल्‍ह्‍यात घडला आहे.

नंदुरबार : येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या व्हॉट्‍सॲप ग्रुपवर अश्‍लील चित्रफीत व्हायरल केल्याप्रकरणी एका अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल झाला. 
आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या व्हॉट्‍सॲप ग्रुपमध्ये एकूण ५३ सदस्य आहेत. त्यात सहा महिला व ४७ पुरुष आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कनिष्ठ कर्मचाऱ्यांपर्यंत सहभाग असलेला व्हॉट्‍सॲप ग्रुप आहे. या ग्रुपवर आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील सहाय्यक नियोजन अधिकाऱ्याने २६ ऑक्टोबरला रात्री ११ वाजून ११ मिनिटांनी अश्‍लील चित्रफीत व्हायरल केली. हा प्रकार दुसऱ्या दिवशी सकाळी ग्रुपमधील सदस्यांच्या लक्षात आला. या प्रकारामुळे ग्रुपमध्ये असणाऱ्या महिला सदस्यांचा अवमान झाला. 

संबंधीतास अटक
घटनेची गंभीर दखल घेऊन कार्यालयीन अधीक्षक वसावे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीवरून संशयित राहुल इदे याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. संशयितास अटक केल्यानंतर एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. दरम्यान, बुधवारी (ता. २८) इदे यांची जामिनावर मुक्तता झाली. अनवधानाने हा प्रकार घडल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर पुढील तपास करीत आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar aadivashi vikas praklp officer whatsaap group forward video