esakal | दिवाळीत नंदुरबारच्या शिधापतत्रिकेच्या लाभार्थ्यांना साखर मिळणार गोडवा !
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळीत नंदुरबारच्या शिधापतत्रिकेच्या लाभार्थ्यांना साखर मिळणार गोडवा !

प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिकाधारकांना एका शिधापत्रिकेवर वीस रुपये प्रति किलोने एक किलो साखर मिळणार आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांची दिवाळी गोड होणार आहे.

दिवाळीत नंदुरबारच्या शिधापतत्रिकेच्या लाभार्थ्यांना साखर मिळणार गोडवा !

sakal_logo
By
फुंदीलाल माळी

तळोदा ः दिवाळी सणासाठी प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना नोव्हेंबर महिन्यात प्रति कार्ड एक किलो साखर २० रुपये प्रति किलोने देण्यात येणार असल्याने सर्वसामान्यांची दिवाळी गोड होणार आहे. यासाठी नंदुरबार जिल्ह्यासाठी १७०४ क्विंटल साखर उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र एका शिधापत्रिकेवर कमीत कमी पाच किलो साखर देण्यात यावी अशी अपेक्षा शिधापत्रिकाधारकांनी व्यक्त केली आहे. 

आवश्य वाचा- झेंडूच्‍या फुलांनी खाल्ला भाव;उत्पादकांमध्ये आनंद ! -

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत नोव्हेंबर महिन्यात प्राधान्य कुटुंब योजना लाभार्थींना दिवाळी सणानिमित्त साखर वाटप करण्यात येणार आहे. त्यानुसार प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिकाधारकांना एका शिधापत्रिकेवर वीस रुपये प्रति किलोने एक किलो साखर मिळणार आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांची दिवाळी गोड होणार आहे. 

नंदुरबार जिल्ह्यातील १,७२,०३१ प्राधान्य कुटुंब योजना शिधापत्रिका धारकांना या साखरेचा लाभ मिळणार आहे. त्यात नंदुरबार तालुक्यातील ४३२९२, नवापूर ३३६६९, तळोदा १७३९५, शहादा ४७९२५, अक्कलकुवा २२९५० व अक्राणी तालुक्यात ६८०० प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिका आहेत. या शिधापत्रिका धारकांना साखर वाटपासाठी नंदुरबार जिल्ह्यात १७०४ क्विंटल साखर नियतन मंजूर करण्यात आले आहे. रेशन दुकानातून गायब झालेली साखर केवळ सणानिमित्ताने मिळत असल्याने काही अंशी समाधान व्‍यक्‍त होत आहे. कमीत कमी पाच किलो एका शिधापत्रिकेवर देण्यात यावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. 
 
संपादन- भूषण श्रीखंडे