esakal | दोघे जिवलग मित्र..कोठेही असायचे सोबत; मृत्‍यूनेही गाठले सोबतच एकाच ठिकाणी
sakal

बोलून बातमी शोधा

accident news

जिवलग मित्र..कोठेही असायचे सोबत; मृत्‍यूनेही गाठले सोबतच एकाच ठिकाणी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नंदुरबार : नंदुरबार- दोंडाईचा रस्त्यावर (Nandurbar dondaicha road accident) भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअप वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने वावद गावाजवळ घडलेल्या अपघातात नंदुरबार येथील दोघे जिवलग मित्र ठार झाले. त्यामुळे सोनार समाजावर शोककळा पसरली आहे. दोन्ही युवक सामाजिक कामात अग्रेसर होते. (nandurbar-bike-accident-two-friend-death-dondaicha)

नंदुरबार येथील अश्विन प्रकाश सोनार (वय ३५, राहणार देसाई पुरा) व सागर सुधाकर सोनार (वय ३५ राहणार बाबा गणपती परिसर, नंदुरबार) सोनार गल्ली नंदुरबार (Nandurbar) हे दोघेजन शिरपूर येथे कामानिमित्त गेले होते. दोघेही जिवलग मित्र असल्याने नेहमी कुठेही सोबतच जात असत. शिरपूरहून नंदुरबारकडे मोटारसायकलीने परत येत असताना पिकअप वाहन (एमएच २८ एच २५१४) हे नंदुरबारहुन दोंडाईचाकडे भरधाव वेगाने जात असताना धडक दिली. वावद गावाजवळ घडलेल्या अपघातात दुचाकीवरील (Bike accident) अश्विन सोनार व सागर सोनार हे दोघे जागीच ठार झाले. दरम्यान पिकप वाहन चालक वाहन सोडून घटनास्थळावरून पसार झाला आहे.

हेही वाचा: बिबट्याच्या पंजाचे ठसे..भीतीने खामखेडा शिवार ओस

गावाची धाव घटनास्‍थळी

घटनेची माहिती मिळताच जो-तो मिळेल त्या वाहनाने घटनास्थळाकडे रवाना झाले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस पथकही घटनास्थळी पोहोचले. दोन्ही मृतदेह तत्काळ नंदुरबार जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे श्‍वविच्छिदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत मृताचे भाऊ आनंद सोनार यांच्या फिर्यादीवरून पिकअप वाहन चालकाविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक चौधरी पुढील तपास करीत आहेत.

समाज कार्यात पुढे

अश्‍विन सोनार व सागर सोनार हे दोन्हीही जिवलग मित्र होते. अश्‍विन हा भाजपच्या युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस पदाची धुरा सांभाळत होते. तसेच वडिलांना टेलरिंग व्यवसायात मदत करत होता. तर सागर हा वडिलांना व्यवसायात मदत करत होता. सागर हा एकुलता एक मुलगा होता. त्याच्‍या निधनाने कुटुंबाचा आधारवड हरपला. हे दोन्हीही दादा व बाबा गणपती मंडळाचा सामाजिक कार्यात अग्रेसर राहत होते. तर लॉकडाऊन काळात इतर मित्रांचा सहकार्याने हे सुवर्ण युवा शक्ती ग्रुपच्या माध्यमातून रुग्णालयांमध्ये रूग्णांचे नातेवाईक, गोर गरीब लोकांना दोन्ही वेळचे जेवण वाटप करत होते.