esakal | येत्या दीड महिन्यात राज्यात फडणवीस सरकार
sakal

बोलून बातमी शोधा

devendra Fadnavis

सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकिय हालचालींबाबत त्यांच्याशी संवाद साधतांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भेटी संदर्भात मत जाणून घेतले.

येत्या दीड महिन्यात राज्यात फडणवीस सरकार

sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार : महाराष्ट्रात लवकरच राजकिय समीकरणे बदलतील व येत्या दीड महीन्यात राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार असेल, असा दावा भाजपचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केला आहे. 
भाजपने कोरोना काळात केलेल्या कामाची माहिती देण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. श्री. चौधरी हे विरोधी पक्ष नेते श्री. फडणवीस यांचे निकटवतीर्य असून त्यावेळी सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकिय हालचालींबाबत त्यांच्याशी संवाद साधतांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भेटी संदर्भात मत जाणून घेतले. त्यावर बोलतांना चौधरी म्हणाले, की जे काही सुरू आहे; ते नक्कीच आशादायक आहे. पक्षीय दृष्ट्या त्या गुप्त हालचाली आहेत. त्यातून नक्किच येत्या काळात भाजपसाठी चांगले घडणार आहे. 

म्‍हणून फडणवीसांच्या नेतृत्‍वाची गरज
भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा नेतृत्वाची या महाराष्ट्राला नितांत गरज आहे. त्याबरोबरच अनेक बाबतीत सध्याचे शासन अपयशी ठरले आहे. ज्या काही राजकिय हालचाली सुरू आहेत. त्या नक्कीच राजकिय इतिहास घडवतील. नेत्यांचा गुप्तगू बैठकांवर बोलणे उचित ठरणार नाही. मात्र जास्त दिवस नाही; येत्या दीड महिन्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील. यात कोणतीही शंका नसल्‍याचे त्‍यांनी सांगितले. 

संपादन ः राजेश सोनवणे