कोरोनाची लक्षणं घाबरवताय...मग ‘आय एम हेल्‍दी’ ओपन करा व पहा

धनराज माळी
Thursday, 16 July 2020

व्यक्तीला, आरोग्य विभाग, कुटुंबीय, मित्र व फॅमिली डॉक्टरांनाही त्याचा आरोग्य अहवाल व्हायरल करता येणार आहे. जेणेकरून पुढील धोका टाळता येणार आहे. या ॲप सोबतची स्कॅनिंग कीट ही शाळा, महाविद्यालयांसोबतच कार्यालयांच्‍या प्रवेश द्वारावर लावून येणाऱ्या-जाणाऱ्यांना स्वतः आपली आरोग्य तपासणी करता येणार आहे.

नंदुरबार : येथील बी.ई. मेकॅनिकल पदवी धारण केलेले योगेश अशोक अहिरे या उच्च शिक्षित तरुणाने ‘इमपेल इन्फोटेक्ट प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीच्या माध्यमातून ‘आय एम हेल्दी’ॲप विकसित केले आहे. हे ॲप मोबाईलद्वारे स्कॅनिंगचे काम करणार आहे. ज्याच्‍यामुळे बाधित रूग्णांचे लक्षणे कळणार आहेत. त्यातून त्या व्यक्तीला, आरोग्य विभाग, कुटुंबीय, मित्र व फॅमिली डॉक्टरांनाही त्याचा आरोग्य अहवाल व्हायरल करता येणार आहे. जेणेकरून पुढील धोका टाळता येणार आहे. या ॲप सोबतची स्कॅनिंग कीट ही शाळा, महाविद्यालयांसोबतच कार्यालयांच्‍या प्रवेश द्वारावर लावून येणाऱ्या-जाणाऱ्यांना स्वतः आपली आरोग्य तपासणी करता येणार आहे. हे ॲप ऑगष्ट महिन्यात लॉन्चिंग करणार असल्याची माहिती योगेश अहिरे यांनी दिली. 

अहिरे यांनी इमपेल इन्फोटेक्ट ही कंपनी स्थापन केली आहे. सध्या ते पुण्यात नोकरीनिमित्त होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार येथे परत आले आहेत. याच संधीचा फायदा घेत त्यांनी कोरोनाची लक्षणे ओळखण्यासाठी काही तरी संशोधन करावे, या विचाराने त्यांनी कामाला सुरवात केली. तीन महिन्यात त्‍यांनी आय एम हेल्दी’ या ॲपची निर्मिती केली. यासाठी कायदेशीर नोंदणी, परवानगी घेण्यात आली आहे. या ॲपचे डेमोस्टेशन आयएस, आयपीएस अधिकाऱ्यांना दाखविण्यात आले. त्यांच्याकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळाल्याचे श्री. अहिरे यांनी सांगितले. या ॲपमध्ये युजर ॲप्लिकेशन व ॲडमिन ॲप्लिकेशन असे दोन भाग आहेत. त्याच्या माध्यमातून माणसाचा ताप, ऑक्सिजनचे प्रमाण यासह कोरोनाचे लक्षणे कळणार आहेत. हे ॲप गेट पास म्हणून काम करणार आहे. ही किट शाळा-महाविद्यालये, कार्यालयांमध्ये लावता येणार आहे. ज्याच्‍यामुळे प्रवेश करताना या कीट व ॲपच्‍या माध्यमातून आपली हेल्थ हिस्ट्री कळणार आहे. बाधिताचे लक्षणे दिसल्यास त्यांना प्रवेश टाळून तत्काळ उपचारासाठी पाठविण्यास मदत होणार आहे. 

वेळेसह संसर्ग टळणार 
सध्या आरोग्य विभाग नागरिकांचे स्किनिंग प्रत्यक्ष घरोघरी जाऊन करीत आहेत. त्यामुळे त्यांनाच संसर्ग होऊ लागला आहे. तसेच वेळही जात आहे. मात्र या किटमुळे घरोघरी जाण्याची गरज नाही. ही वॉर्डनिहाय अथवा गावात हे यंत्र कार्यान्वित केल्यास नागरिक स्वतः जाऊन आपली टेस्ट करू शकणार आहे. तसेच हाताळण्याची पध्दतही सोपी आहे. असे श्री. अहिरे यांनी सांगितले. यावेळी कंपनीचे उपाध्यक्ष रमण साळवे, शुभम बडगुजर आदी उपस्थित होते.

 

संपादन : राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar corona testing heldi mobile app devlop