अलन्नाच्या कर्मचाऱ्यांनी तयार केले सॅनिटायझर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

अपुऱ्या साधनांद्वारे ही यंत्रणा दिवस रात्र परिश्रम घेत आहे. काही ठिकाणी नागरिकांना कोरोनाचे गांभीर्य नाही अशा लोकांची काळजी घेण्यासाठी महसूल प्रशासन व पोलीस यंत्रणा देखील अहोरात्र परिश्रम घेत आहे.

वाण्याविहीर  : कोरोनाच्या विरोधात लढणाऱ्या तसेच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या डॉक्टर, कर्मचारी प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी व पोलीस बांधवांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी अक्कलकुवा येथील अली अलन्ना औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी हात साफ करण्यासाठी सॅनिटायझरची निर्मिती करून सॅनिटायझरचे शासकीय कार्यालयात वाटप करण्यात आले. 
देशभरात विशेषतः राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे, संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रुग्णांची काळजी व शुश्रूषा करण्यासाठी सर्वत्र आरोग्य यंत्रणा कार्यरत झालेली आहे. अपुऱ्या साधनांद्वारे ही यंत्रणा दिवस रात्र परिश्रम घेत आहे. काही ठिकाणी नागरिकांना कोरोनाचे गांभीर्य नाही अशा लोकांची काळजी घेण्यासाठी महसूल प्रशासन व पोलीस यंत्रणा देखील अहोरात्र परिश्रम घेत आहे. स्वतःची काळजी घेताना वारंवार साबणाने हात धुणे शक्य नाही त्यामुळे त्यांना केवळ सॅनिटायझर वापरणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे या करिता जामिया इस्लामिया इशाउतुल उलूम संस्थेचे अध्यक्ष मौलाना गुलाम वस्तानवी यांच्या मार्गदर्शनाखाली अली अल्लन्ना औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य गुलाम जावेद खान, प्रा. खलिफा आसिफ, प्रा. सकीर उस्मानी, प्रा. हुजेफा पटेल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ असरार मक्राणी दींनी जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूत्रानुसार सॅनिटायझर तयार केले. 

असे केले वाटप 
यात त्यांनी अल्कोहोल, हायड्रोजन पेरॉक्साईड, ग्लिसोरॉल, गुलाब तेल, डिस्टील वॉटर या साहित्याचा योग्य प्रमाणाने वापर केला. हे सॅनिटायझर तयार करून त्यांनी तहसीलदार विजय कच्छवे यांना कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी ५०, पोलिस निरीक्षक मेघश्याम डांगे यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी ५०, ग्रामीण रुग्णालयासाठी ५०, युनानी वैद्यकीय महाविद्यालयासाठी ५०, अस्सलाम रुग्णालयात ५० असे बॉटलचे वाटप करण्यात आले. 

पुन्हा तयार करू : जावेदाखान 
येत्या काळात गरजे नुसार सॅनिटायझर ची पुन्हा निर्मिती केली जाईल अशी माहिती प्राचार्य गुलाम जावेदखान, यांनी दिली. सॅनिटायझरचे वाटप झाल्यामुळे विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar corona virus sanetizer creat alnna emloyee