रुग्णसंख्या वाढूनही कोरोनाचे 'भय ना,भीती'; नंदुरबारात कैऱ्यांच्या बाजार भरला

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 June 2020

कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी जिल्हाभरात आठवडे बाजारात भरण्यावर बंदी घातलेली आहे.नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचेही आदेश आहेत. जून महिन्यापासून लोणचे बनवण्यासाठी महिला वर्गाची मोठी लगबग असते.

नंदुरबार : कोरोनाचा प्रादुर्भाव टळावा यासाठी जिल्हा प्रशासनाने आठवले बाजारावर बंदी घातलेली असताना मात्र आज मंगळवारी नंदुरबारात कैद्यांच्या बाजार भरण्याचे दिसून आले.कैऱ्यांच्या खरेदी करण्यासाठी नागरिकांची विशेष करून महिलांची गर्दी झाली होती. कोरोनाचे भय न  बाळगणाऱ्यामूळे सोशल डिस्टन्सची 'ऐसी की, तैसी' झाल्याचे  पाहायला मिळाले.

कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी जिल्हाभरात आठवडे बाजारात भरण्यावर बंदी घातलेली आहे.नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचेही आदेश आहेत. जून महिन्यापासून लोणचे बनवण्यासाठी महिला वर्गाची मोठी लगबग असते. कैरीचे लोणचे बनवण्याच्याची परंपरा जून महिन्यापासून सुरू होत असते. यासाठी विविध जातीच्या कैऱ्यांच्या वापर करण्यात येत असतो.

 नंदुरबार शहरात मंगळवारच्या दिवशी  आठवडे बाजार भरत असतो. परंतु, कोरोनाचा पार्श्वभूमीवर प्रशासनाने बाजार भरण्यावर बंदी घातलेली असल्याने व्यापाऱ्यांकडून नियमांचे पालन करण्यात येते. परंतु, नंदुरबार शहरात आज मंगळवारी कैद्यांच्या  बाजार भरल्याचे चित्र पाहायला मिळाले.

सुभाष चौकात कैऱ्या खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाली होती. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगची 'ऐसी की, तैसी' झाली. नंदुरबार जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असतांना नागरिक मात्र बाजार करण्यासाठी गर्दी करत आहेत.यामुळे कोरोनाचा मोठा विस्फोट होऊ शकतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar corona virus spread weakly market bajar