esakal | नंदुरबार जिल्ह्यात उरले केवळ २४२ रूग्ण ॲक्टीव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus

नंदुरबार जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन करून कोरोनाला जिल्ह्यात नो एंट्री देण्याचा प्रयत्न केला. मात्र लॉकडाऊनमुळे बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांच्या लोंढामुळे शेवटी कोरोनाने जिल्ह्याला घेरले होते.

नंदुरबार जिल्ह्यात उरले केवळ २४२ रूग्ण ॲक्टीव्ह 

sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार : जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, पोलिस यांच्या प्रयत्नांमुळे व नागरिकांनीही प्रशासनाचा आवाहनाला साद दिल्याने कोरोना महामारीला नियंत्रणात आली आहे. आता दैनंदिन कोरोना रूग्णांचा आकडा अत्यल्प असून मृतांची संख्याही स्थिर आहे. राज्यात नंदुरबार जिल्ह्यात सर्वात उशिरा शिरकाव व सर्वप्रथम नियंत्रणात आल्याने मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या कामाचे कौतुक केले आहे. 

गेल्या मार्चपासून देशात कोरोना महामारीला सुरूवात झाली.२२ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले. त्यानंतर नंदुरबार जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन करून कोरोनाला जिल्ह्यात नो एंट्री देण्याचा प्रयत्न केला. मात्र लॉकडाऊनमुळे बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांच्या लोंढामुळे शेवटी कोरोनाने जिल्ह्याला घेरले होते. मंद गतीने आलेला कोरोनाने उग्ररूप धारण करीत दररोज नंदुरबार शहर व शहादा येथे कोरोना रूग्णांची सख्या लक्षणीय वाढली होती. जून ते ऑगष्ट महिन्यात कोरोना रूग्णांचा आकडा वेगाने वाढला होता. एकंदरीत आठ महिन्याचा कोरोना काळात प्रशासनाने केलेले नियोजन व उपाययोजना आणि नागरिकांनी केलेले नियमांचे पालन करीत जिल्ह्यातील २४ हजार ८९५ रूणांचे स्वॅब तपासणी केली होती. 

सहा हजार रूग्ण पॉझिटिव्ह 
जिल्ह्यातील २४ हजार ८९५ रूणांचे स्वॅब तपासणी केली होती. तसेच माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियान राबविण्यात आले. त्यामुळे सहाहजार शंभर रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यांच्यावर जिल्ह्यातील कोविड उपचार सेंटरमध्ये व काहींनी खासगी रुग्णालयांमध्ये योग्यवेळी उपचार घेतले. त्यातच आरोग्य यंत्रणा योग्य उपचारासाठी आवश्यक औषधांसह सज्ज असल्याने ५ हजार ६०० रूग्ण बरे झाले. त्यांना वेळीच योग्य उपचार मिळाल्याने त्यांनी कोरोनावर मात केला. 

१४६ जणांचा मृत्यू 
कोरोनामुळे जिल्ह्यातील १४६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात वृध्दांची संख्या जास्त आहे. कोरोना संसर्गामुळे रोग प्रतिकार शक्ती कमी असल्याने या रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात काही मध्यमवयीन तर काही तरूणांचाही समावेश आहे. त्या रूग्णांनी रुग्णालयापर्यंत पोहोचण्यास उशीर केल्याने त्यांना मृत्यूचा दाढेतून काढणे आरोग्य यंत्रणेला शक्य झाले नाही. 

गाफील राहू नये 
कोरोना नियंत्रणात आला आहे. कोरोना संपलेला नाही. लॉकडाऊनच्या काही अटी शिथिल केल्या आहेत. पूर्णतः मोकळे सोडेलेले नाही. त्यामुळे दिवाळीतील बाजारपेठेतील गर्दीचा विचार करता नागरिकांनी गाफील राहू नये, प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे, तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे. 
 
प्रशासनाचे मुख्यमंत्र्याकडून कौतुक 
जिल्ह्यात तीन महिन्यात अत्यंत वेगाने कोरोना वाढला. त्याच गतीने सध्या कमी झाला आहे. सध्या जिल्ह्यात २४२ रूग्णांवर उपचार सुरू आहे. एवढे रूग्ण तर एका स्वॅब तपासणी अहवालातून निघत होते.त्यामुळे जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आला आहे. प्रशासनाने केलेल्या चांगल्या कामाचे मागील आठवड्यात झालेल्या ऑनलाइन भूमिपूजनाचा कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले. 

संपादन ः राजेश सोनवणे