शिल्लक कापसाची माहिती एका दिवसात मिळू शकते! 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 May 2020

शिल्लक राहिलेल्या कापसाची नेमकी माहिती मिळावी यासाठी कृषि सहाय्यकांकडील नोंदी आणि शेतकऱ्यांचे क्रमांक असलेली यादी आहे. त्यामुळे ही माहिती एका दिवसात मिळू शकते. यातून पुढील नियोजन करणे सोपे होणार

नंदुरबार : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सीसीआयकडे कापसाची नोंद केली आहे. त्यानुसार त्यांना बोलविण्यात येत असले तरी ही गती फारच धिमी असल्याने सर्वच कापसाच्या खरेदीबाबत सांशकता व्यक्त होत आहे. आजपर्यत अवघ्या तीसच टक्के शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी झालेली असल्याने जवळ आलेला पावसाळा आणि नेमका शिल्लक राहिलेल्या कापसाची नेमकी माहिती मिळावी यासाठी कृषि सहाय्यकांकडील नोंदी आणि शेतकऱ्यांचे क्रमांक असलेली यादी आहे. त्यामुळे ही माहिती एका दिवसात मिळू शकते. यातून पुढील नियोजन करणे सोपे होणार आ. 
जिल्ह्यात सीसीआयच्या शहादा आणि नंदुरबार येथील केंद्रावर मिळून पाच हजार आठशे शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी नोंदणी केली आहे. मात्र आपला कापूस विकला जाणार किंवा नाही ही चिंता शेतकऱ्यांना लागून आहे. संपूर्ण कापसाची वेळेत खऱेदी व्हावी यासाठी सीसीआयकडेही पुरेशी यंत्रणा नाही किंवा तशी हालचाल दिसत नाही. पावसाळा जर ३१ मेला सुरू झाला तर सीसीआयला खरेदी केलेला कापूस आवरणे कठिण होणार आहे. दुसरीकडे आजपर्यत झालेल्या गाठीही अजून जिनिंगच्या आवारातच आहेत. त्यांचा वेळीच सुरक्षित साठा होणे गरजेचे आहे. या स्थितीत संपूरण कापसाची खरेदी होण्यासाठी सहकार, कृषि आणि महसूल या यंत्रणांनी वारफुटींगवर काम केले तरच काहीतरी मार्ग निघू शकेल व शेतकऱ्याला न्याय मिळेल. 

नेमका किती कापूस शिल्लक आहे याचा तत्काळ अंदाज येण्यासाठी ढोबळमानाने शेतकऱ्यांचा सातबारा आणि सरासरी उत्पन्न याचीही सांगड घालता येईल. मात्र कृषि सहाय्यकांकडील डाटा येताच निश्‍चित अंदाज येईल. आधीच विविध अडचणीनंतर सुरू झालेल्या या खरेदीमुळे जेमतेम शेतकऱ्यांना आधार मिळत आहे. त्यामुळे पावसामुळे ती रखडली तर शेतकऱ्यांवर आत्महत्येचीच वेळ येईल अशी स्थिती आहे. त्यामुळे सर्वच यंत्रणांनी युध्दपातळीवर काम करून सर्व कापूस खरेदी होईल याचे नियोजन करावे. 
 
संख्या मिळाली, कापसाचा तपशील? 
कृषि सहाय्यकांनी प्रत्येक शेतकऱ्यांकडे किती कापूस शिल्लक आहे याचा अंदाज याद्या तयार करताना का घेतला नाही हा प्रश्‍नच आहे. तेव्हा फक्त नावे मागविली होती,त्यामुळे गावनिहाय शेतकरी संख्या मिळाली, पण कापूस किती आहे हे समजले नाही. यामुळे आतातरी कृषि विभाग- बाजार समिती आणि सीसीआयमध्ये समन्वय राहणे गरजेचे आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar cotton pending home details one day