esakal | लाखोचा अवैध मद्यसाठा पकडला! पिंपळनेर पोलिसांची कामगिरी
sakal

बोलून बातमी शोधा

crime

लाखोचा अवैध मद्यसाठा पकडला! पिंपळनेर पोलिसांची कामगिरी

sakal_logo
By
टीम ई सकाळ


पिंपळनेर : येथील पोलिसांना (Sakri Police) मिळालेल्या गुप्त माहितीवरून पखरूणपाडा (ता. साक्री) गावाजवळून एका वाहनात देशी-विदेशी दारूने (liquor) भरलेले बॉक्स बाळगून चोरटी वाहतूक करताना दोन संशयित मिळून आले. त्यात वाहनासह एक लाख ३३ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत याबाबत पिंपळे पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

(sakri taluka pimpalner police action unligaly Illegal liquor confiscated)

हेही वाचा: हतनूर पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस;धरणाचे दहा दरवाजे उघडले


पिंपळनेर ते नवापूर रोडने पखरूणपाडा (ता. साक्री) गावाजवळून वाहन (एमएच ०४/बीवाय २६४९) देशी-विदेशी दारूने भरलेले बॉक्स घेऊन जाणार असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे यांना मिळाली. त्यावरून पोलिस शिपाई दीपक माळी, हवालदार वाय. डब्ल्यू. पवार, प्रवीण सोनवणे, ग्यानसिंग पावरासह रेडिंग पार्टीचे पोलिस व पंच असे रात्री १०.२० ला पिंपळनेर पोलिस ठाण्यामधून रवाना झाले. पिंपळनेर ते नवापूर कुडाशी रोडवरील पाखरूणपाडा गावापुढे ५० मीटर अंतरावर पुढे जाऊन झाडांचा आडोसा बघून दबा धरून बसले असतांना रात्री वाहन पिंपळनेर गावाकडून येताना पाडा गावातील रस्त्यावरील पथदीपाच्या उजेडात दिसले.

हेही वाचा: काँग्रेस महानगराध्यक्षपदी ‘आयारामांना’ संधी!

पथक रस्त्यात उभे राहून वाहनचालक सुचितकुमार हिरामण जगताप (वय ३३, चौगाव, ता. बागलाण, जि. नाशिक), तसेच सोबत असलेला केशव राजेंद्र सोनवणे (२८, रा. इंदोरानगर, मोरेनगर, सटाणा, ता. बागलाण) यांना ताब्यात घेतले. वाहनात देशी दारूचे १३ बॉक्स, बिअरचे ५०० मिलिलिटरचे दोन सीलबंद बॉक्स व वाहन असा एकूण एक लाक ३३ हजार ६८० रुपयांचा माल ताब्यात घेतला. संशयित आरोपी सुचितकुमार जगताप, केशव सोनवणे यांच्याविरुद्ध सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे यांच्या आदेशान्वये पिंपळनेर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

loading image