esakal | नंदुरबार जिल्ह्यात शेतकऱ्यांची पिके वाचविण्यासाठी कसरत
sakal

बोलून बातमी शोधा

नंदुरबार जिल्ह्यात शेतकऱ्यांची पिके वाचविण्यासाठी कसरत

नंदुरबार जिल्ह्यात शेतकऱ्यांची पिके वाचविण्यासाठी कसरत

sakal_logo
By
धनराज माळी


नंदुरबार ः नंदुरबार जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत उशिरा पावसामुळे (Rain) खरीप हंगामाला उशिरानेच सुरुवात झालेली आहे, परंतु यंदा जुलै महिन्याच्या १५ दिवसानंतरही दमदार पावसाचं आगमन झालेले नाही. त्यामुळे पेरण्या (Sowing) खोळंबल्या आहेत. कृषी विभागाच्या माहितीनुसार यंदा जिल्ह्यातील ऊस पीक वगळता कापूस, भात, सोयाबीन, मका, तुर, उडीद, मूग या प्रमुख पिकांसाठी २ लाख ९५ हजार २२० हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी नियोजित आहे. त्यापैकी आतापर्यंत फक्त १ लाख ७५ हजार ७३९ हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहे. सरासरी ५९.५२ टक्केच पेरण्या झालेल्या आहेत.

(nandurbar district only ninety percent sowing has been completed )

हेही वाचा: 'ईडी'ची चौकशी पूर्ण झाल्यानंतर बोलणार..!


नंदुरबार जिल्ह्यात १ जून ते आतापर्यंत सरासरी ३२.० टक्केच पाऊस झाला आहे. यावर्षी खरीप हंगामातील पिकांसाठी कृषी विभागाने विविध पिकांसाठी २ लाख ९५ हजार २२० हेक्टर क्षेत्र पिक पेरणीसाठी नियजित ल होते.मात्र पावसाने चांगलाच ताण दिल्याने पेरणयुक्त पाऊस झालाच नाही. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या.मात्र मध्यंतरी बेमोसमी पाऊस झाला होता. त्यावेळी काही शेतकऱ्यांनी मे. महिन्यातील कापूस लागवड केली होती. र कोरडवाहू पिकांसाठी वरचा पाण्यावरच शेतकरी अवलंबून आहेत. त्यामुळे खरीपातील इतर पिकांच्या पेरणीसाठी शेतकरी जोदार पावसाची प्रतिक्षा करीत राहिले. कृषी विभागानेही किमान १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नये, असे आवाहन केले होते.त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या नाहीत. काही शेतकऱ्यांनी शंकट औढवून घेत पेरण्या केल्या आहेत.त्यामुळे सध्या १ लाख ७५ हजार ७३९ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.म्हणजेच सरासरी ५९ .५२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्या वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहेत.अशी माहिती कृषी विभागाने दिली.

हेही वाचा: वाढदिवसाची रात्र ठरली अखेरची रात्र..तरुणाचा निर्घृण खून

पावसाचे आगमन
गेल्या दोन दिवसापासून जोदार पावसाला सुरूवात झाली आहे. उशिरा का होईना चांगला पाऊस पडत असल्याने पिकांना जीवनदान मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात पेरणीयोग्य दमदार पाऊस झालेला नाही. त्याचबरोबर नदी-नाले प्रवाहीत झाले नसल्यामुळे शेती उपयोगी पाण्यासाठी बोरवेल व विहिरींना पाण्याचे प्रमाण कमी आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी कापूस लागवडी सहन या पिकांची पेरणी केली आहे परंतु पावसाअभावी या पिकांची वाढ खुंटली आहे. तर काही भागात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे दुबार पेरणीचे संकट देखील आहे.
-निलेश भागेश्वर, कृषी अधीक्षक अधकारी,नंदुरबार

हेही वाचा: शेतकऱ्यांना अनुदान वितरीत करा..अन्यथा बँकांवर पोलिस कारवाई


हवामान विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत फक्त ३१३.६ मिमी व सरासरी १००.५ मिमी पर्जन्यमान झालेले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३२.० टक्के एवढा पाऊस झालेला आहे. आणखी पुढील काही दिवस पावसाने दडी मारल्यास खरीप हंगामावर मोठा परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. दुबार पेरणी व बियाण्यांचा खर्च टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य पाऊस झाल्यावरच पेरण्या कराव्या असे आवाहन कृषी विभागाने वारंवार शेतकऱ्यांना केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या कमी पर्जन्यावर शेतकऱ्यांकडून ५९.५२ टक्के पेरण्या पूर्ण केलेल्या आहे. या पिकांना दमदार पावसाची अत्यंत गरज आहे.
-अमित सुदाम पाटील, शेतकरी कोळदे

loading image