लाल मिरची सध्या वाळविणेच शेतकरी हिताचे 

red chilli Nandurbar
red chilli Nandurbar

कहाटूळ ः कोरोनामुळे राज्यात सुरू असलेल्या संचारबंदीचा फटका नंदुरबार जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. बाजारपेठ आणि वाहतुकीअभावी मागणी घसरली आहे. जिल्ह्यात दरवर्षी सुमारे दोन हजार हेक्टर या पिकाचे उत्पादन घेतले जाते. 


ारच्या सीमावर्ती असलेल्या गुजरात राज्यातील निझर तालुक्यात देखील प्रामुख्याने मिरची लागवड केली जाते. वि.एन.आर, गौरी, प्राईड, नामधारी तसेच अनेक प्रकारची तिखट प्रजातींची लागवड केली जाते. जिल्ह्याची मिरची संपूर्ण महाराष्ट्रात, गुजरात राज्यात आणि मध्य प्रदेश येथील देखील प्रसिद्ध आहे. थोड्या प्रमाणात आखाती देशांमध्येही निर्यात होत होती.नंदुरबार जिल्ह्यात शहादा, नंदुरबार, तळोदा, अक्कलकुवा तसेच नंदुरब संचारबंदी पूर्वी जिल्ह्यातील मिरचीला सुमारे खालील प्रमाणे भाव होते 

संचारबंदीपूर्वी ओल्या मिरचीचे दर 
- ८०० रुपये प्रति क्विंटल व्ही एन आर 
- २००० रुपये प्रतिक्विंटल गौरी 
- ४००० रुपये प्रतिक्विंटल प्राईड 

संचारबंदी पूर्वी सुकलेल्या मिरचीचे दर 
- १५००० रुपये प्रति क्विंटल व्ही एन आर 
- १३००० रुपये प्रति क्विंटल गौरी 
- १४००० रुपये प्रति क्विंटल प्राईड 

संचारबंदीनंतर ओल्या लाल मिरचीचे दर 
- ५०० रुपये प्रति क्विंटल व्ही एन आर 
- १३०० रुपये प्रति क्विंटल गौरी 
- १२०० रुपये प्रति क्विंटल प्राईड 

संचारबंदीनंतर सुकलेल्या मिरचीचे दर 
- ४५०० रुपये प्रतिक्विंटल व्ही एन आर 
- ४५०० रुपये प्रतिक्विंटल गौरी 
- ५५००रुपये प्रतिक्विंटल प्राईड 

या ढासळलेल्या दरामुळे मिरची उत्पादक शेतकरी पूर्णपणे कोंडीत सापडला आहे. या विक्रीतून व्यापाऱ्यांचे कमिशन, हमाली, वाहतुकीचा खर्च, समाविष्ट असल्याने मजुरीचा खर्च देखील मिळत नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यावर पर्याय म्हणून काही शेतकरी मिरची सुकवून ठेवत आहे. 



 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com