esakal | लक्ष्मी पूजनाचा मुहुर्त बाजारपेठेने हेरला
sakal

बोलून बातमी शोधा

diwali festiwal

गेल्या आठ महिन्यापासूनच कोरोनामुळे लॉकडाऊनच्या विळख्यात अडकलेल्या नागरिकांनी दिवाळीची संधी साधत जणू काय बाजारपेठेवर तुटून पडल्यागत चित्र सध्या शहर व परिसरात पहावयास मिळत आहे.

लक्ष्मी पूजनाचा मुहुर्त बाजारपेठेने हेरला

sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार : दिवाळी ही साडेतीन मुहुर्तापैकी एक महत्त्वाचा मानला जाणारा मुहूर्त आहे. त्यामुळे नवीन वस्तूंची खरेदी असो की नवीन व्यवसाय व प्रतिष्ठानाचा शुभारंभ. यासाठी दीपपर्वातील विशेषतः लक्ष्मीपूजनाला विशेष महत्व दिले जाते. आज लक्ष्मी पूजनाचा पूर्व संध्येलाही बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी उसळली होती. विविध वस्तू खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून आज बाजारपेठेत लाखोंची उलाढाल झाली. 

बाजारपेठ पूर्वपदावर 
गेल्या आठ महिन्यापासूनच कोरोनामुळे लॉकडाऊनच्या विळख्यात अडकलेल्या नागरिकांनी दिवाळीची संधी साधत जणू काय बाजारपेठेवर तुटून पडल्यागत चित्र सध्या शहर व परिसरात पहावयास मिळत आहे. कोरोना गेला नाही, कोरोनाला हद्दपार करण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. त्याचे पालन करत सुरक्षित जीवन जगायचा सल्ला शासन-प्रशासनाने दिला आहे. आठ दिवस शासन-प्रशासनाचा आदेशाचे पालन करीत नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले. त्यामुळे सारेच कंटाळवाणी झाले आहेत. हे जरी सत्य असले तरी त्याला दुसरा पर्याय नव्हताच.मात्र दोन महिन्यापासून शासनाने टप्पा टप्याने का होईनात, लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली आहे. त्यामुळे आठ महिन्यापासून बंद असलेले दुकाने व्यावसायिकांनी सुरू केले आहेत. बाजारपेठ पूर्वपदावर आली आहे. 

दिवाळीची खरेदी अन् बाजारात गर्दी 
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ दिवसापासून बाजाराला झळाळी आली आहे. असे असले तरी खऱ्या अर्थाने दोन दिवसापासून बाजारपेठेतील उलाढाल वाढली आहे. सुरुवातीचे दोन दिवस किराणा बाजारात , त्यानंतर कपडे बाजार तर आज मिठाई विक्रेते, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रेते, वाहनांचे शो रूम व सराफ बाजारातही मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. नंदुरबार जिल्ह्यात कोणतेही उद्योगव्यवसाय नाहीत. त्यामुळे येथील जीवनचक्र व अर्थचक्र हे शेती व मोलमजुरीवरच अवलंबून आहे.त्यात दोन वर्षापासून अतिवृष्टी, ओला दुष्काळामुळे शेतीची पुरी वाट लागली होती. यावर्षीही बेमोसमी पावसाने मोठे नुकसान केले. मात्र काही प्रमाणात के आली. त्यातून शेतकऱ्यांचा हातात पैसा खिळू लागला आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसापासून बाजापेठेतील उलाढाल वाढली आहे. कपडे, किराणा माल, दागिने, नवीन वाहने खरेदी सुरू झाली आहे. त्यासोबतच घरातील चैनीच्या वस्तूंमध्येय फ्रिज, एलईडी, कपाट, दुचाकी , ट्रॅक्टर खरेदी-विक्रीला वेग आला आहे. त्यात आज लक्ष्मी पूजनाचे मुहूर्त् साधत अनेकांनी विविध नवीन वस्तू खरेदीला प्राधान्य दिले. त्यामुळे बाजारपेठ आजही गर्दीनेे फुलली होती. त्यामुळे लाखोची उलाढाल झाली आहे. 

शिक्षकांचे थकित वेतन मिळाल्याने बाजारपेठेत तेजी 
शिक्षकांचे व निवृत्त शिक्षकांचे थकित वेतन या दोन दिवसात बॅंकेत जमा झाले. त्यामुळे तीन-चार महिन्या एकत्रित पगाराची रक्कम मिळाल्याने शिक्षकांची दिवाळी गोड झाली आहे. त्या गोडव्याचा आनंदाबरोबरच त्या रक्कमेतून अनेकांनी महिलांसाठी दागिने, काहीजणानी मुला-मुलींसाठी दुचाकी तर काहींनी संगणक लॅपटॉप खरेदीला प्राधान्‍य दिले. त्यामुळे बाजारपेठेतील उलाढाल दुपट्टीने वाढली आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे