जीर्ण दस्तावेज शोधतातय भवितव्याचा आधार !

योगेश इेशी
Wednesday, 30 December 2020

अनेक पिढ्यांचे दाखल रजिस्टरमध्ये जन्म तारीखांच्या नोंदी आहेत. ५० वर्षापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे. यापैकी आज घडीला बहुतांश विद्यार्थी हयात नाहीत.

कळंबू : जिल्हा परिषद शाळेत असणारे जुने दस्तावेज जीर्ण झाली आहेत. ही दस्तवेज अपडेट करण्यात आली नाही. यामुळे तालुक्यातील अनेक शाळांमधील दस्तऐवजांना वाळवी लागल्याचे दिसून येते. त्यामुळे अनुक मुलांच्या पाल्यांना शासकीय प्रमाणपत्रासाठी लागणारे आवश्यक नोंदी मिळून येत नसल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

आवश्य वाचा- दुर्दैवी घटना : जवानाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गावकरी तयारीत; एक फोन आला, दुःखाचा डोंगर कोसळला

 

देशाला स्वतंत्र प्राप्तीनंतर ग्रामीण भागात जिल्हा परिषदेमार्फत शिक्षणाची दालने निर्माण करण्यात आली आहे . शाळांनी अनेक विद्यार्थ्यांच्या पिढ्या अनुभवल्या आहेत. शाळा तेच आहेत परंतु प्रारुपमध्ये बदल करण्यात आहेत. या शाळेत अनेक पिढ्यांचे दाखल रजिस्टरमध्ये जन्म तारीखांच्या नोंदी आहेत. ५० वर्षापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे. यापैकी आज घडीला बहुतांश विद्यार्थी हयात नाहीत. परंतु त्यांच्या पाल्यांना आवश्यक दस्तऐवज तयार करताना वडिलोपार्जित नोंद असणाऱ्या रेकॉर्ड गरज पडत असल्याने गावातील शाळेत धाव घेत आहेत. परंतु शाळेत जुने रेकॉर्ड बघून थक्क होतात. 

 

वाळवीने फस्त केले 

जिल्हा परिषद शाळेत असणारे जुने रेकॉर्ड जीर्ण झाले आहे. वारंवार रजिस्टरची उलथापालथ करण्यात येत असल्याने रेकॉर्डची अवस्था वाईट झाली आहे. महत्त्वाचे रेकॉर्ड असल्याने मुख्याध्यापक त्यांचे जतन करण्याचे प्रयत्न करीत आहेत. परंतु त्यांच्या या प्रयत्नांना बहुतांशरित्या यश आले नाही. कापडात गुंडाळण्यात आलेले रेकॉर्ड वाळवीने फस्त केली आहे. तर काही रजिस्टरमधील पाने गायब झाली आहेत.

आवर्जून वाचा- रेल्वे प्रवाशाचे प्राण वाचविणार्‍या रणरागिणीच्या पाठीवर कौतुकाची थाप

 

पालकांची फिराफीर

जुन्या पिढीचे रेकॉर्डचे जतन करताना जिल्हा परिषदेचा प्रशासन गंभीर नसल्याचे चित्र कळंबू परिसरातील बहुतांश जिल्हा परिषद शाळामध्ये सन १९४९ पूर्वीपासूनचा जीर्ण रेकॉर्ड रजिस्टरमध्ये आहे. या रजिस्टरची पाने फाटक्या अवस्थेत आहे. जातीचे प्रमाणपत्र तयार करताना पाल्यांना याच नोंदीची आवश्यकता आहे. आज घडीला हा रेकॉर्ड दिसत असला तरी येत्या १० वर्षानंतर जीर्ण रजिस्टर दिसणार नाही. बहुतांश शाळेमध्ये जुने जीर्णरेकार्ड जतन करण्यात आले नाही. यामुळे त्याचे कडून एकच रेकॉर्ड नसल्याचे शेरा देण्यात येत आहे. यामुळे पाल्यांना वडिलाचे रेकॉर्ड करिता जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घ्यावी लागते व आर्थिक, मानसिक मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

शाळा डिजिटल, दस्‍तावेज खाताहेत वाळवी 
बहुतांश जिल्हा परिषद शाळा डिजिटल झालेल्या आहेत. तर काही शाळा नावापुरत्या मर्यादित आहेत. या शाळेत संगणक आहेत . परंतु जुना रेकॉर्ड अपडेट करण्यात आला नाही. यामुळे रेकॉर्डकरिता धांदल उडत आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar documents government school dilapidated