शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार द्या 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 8 February 2020

प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष गुलाब महारू मराठे यांनी जिल्हा प्रशासनाला याबाबत निवेदन दिले आहे. त्यात शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत त्वरित निर्णय न झाल्यास संघटनेतर्फे येत्या फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. 

नंदुरबार : शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांबाबत शासन उदासीन असून, नंदुरबार तालुक्‍यात गेल्या दोन-तीन वर्षांपासून कोरडा दुष्काळाने होरपळलेला शेतकरी यंदा ओल्या दुष्काळाने होरपळला आहे. त्याला मदतीसाठी अजूनही प्रतिक्षाच करावी लागत असून ती तातडीने मिळावी, तसेच सध्या सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा करावा आदी मागण्या प्रहार शेतकरी संघटनेने केली आहे. 

तालुक्‍यात मध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागला. शासनाने वारंवार मदत घोषित करुनही काही मोजक्‍या शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत करण्यात आली. आजही अनेक शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. गेल्या खरीप व रब्बी हंगामासाठी वारंवार निवेदन देऊनही शेतकरी बांधवांना शासकीय मदत मिळालेली नाही. 
संघटनेने दिलेल्या निवेदनात केलेल्या मागण्या अशा ः कोरड्या व ओला दुष्काळ असल्याने शासनाने शेतकऱ्या हेक्‍टरी हजार रुपयांची मदत द्यावी. तालुक्‍यातील शेतकरींना सिंचनासाठी दिवसा विद्युत पुरवठा करण्यात यावा. मागील खरीप व रब्बी हंगामाच्या पिकविम्याची नुकसानभरपाई त्वरित शेतकरी बांधवांना मिळावी. नंदुरबार कृषि उत्पन्न बाजार समितीत केंद्र शासनाने लागू केलेली ई-लिलाव पद्धत (प्लॉट सिस्टीम) बंद करुन येणाऱ्या रब्बी हंगामासाठी ढेर पद्धतीने लिलाव पद्धत सुरु करुन शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवावी. नंदुरबार कृषि उत्पन्नन बाजार समितीत धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीस आणत असतात. परंतू शेतकऱ्यांची बाजार समितीकडे किंवा व्यापाऱ्याकडे कुठल्याही प्रकारे नोंद केली जात नाही. त्यासाठी बाजार समितीने होणाऱ्या कांदा विक्रीची नोंद ठेवून व व्यापाऱ्यांनी शेतकरींना आपल्या मालाच्या विक्रीच्या पक्‍क्‍या पावत्या देणे बंधनकारक करावे. जेणेकरुन शेतकऱ्यांना शासनाने अनुदान जाहीर केल्यास शेतकरी अनुदानास पात्र ठरु शकतात. केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर बंदी आणली आहे, या बंदीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. म्हणून केंद्र शासनाची ही निर्यातबंदी त्वरित हटविण्यात यावी. 

बुराई प्रकल्पाचा लाभ व्हावा 
प्रकाशा-बुराई सिंचन योजनेतून शेती सिंचनासाठी नंदुरबार तालुक्‍यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांना वावद, वटबारे व वडवद इत्यादी लघुतलावात पाणी सोडण्याची व्यवस्था करण्याबाबत तापी विकास महामंडळाला निर्देश देण्यात यावेत. शासनाने जाहीर केलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात नंदुरबार तालुक्‍यातील गावांचा समावेश करण्यात यावा. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar farmer 25 thousand help hektri