नंदुरबारला दोन हजार मेट्रिकटन खताची गरज 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 July 2020

नंदुरबार तालुक्यातील सहा कृषी केंद्रांवर जवळपास २२५ मेट्रिकटन इफको, तर १५१ मेट्रिक टन कृभको युरिया खताचे वाटप करण्यात आले. नंदुरबार तालुक्यातील दोन ते अडीच हजार शेतकऱ्यांना ३७६ मेट्रिक टन युरिया खताचे वाटप या ठिकाणी सहा केंद्रांवरून करण्यात आले आहे.

शनिमांडळ : नंदुरबार जिल्‍ह्यात १२०० मेट्रिक टन युरिया खताचा पुरवठा झाला असून, अजून दोन हजार मेट्रिक टन खताची अवश्यकता असून शेतकऱ्यांची मागणी वाढली आहे. इफको आणि कृभको या रासायनिक युरिया खताचे वाटप प्रशासनाकडे प्रति बॅग २२६ रुपये प्रमाणे प्रति शेतकरी तीन ते चार बॅगा वाटप करण्यात आले. 

नंदुरबार तालुक्यातील सहा कृषी केंद्रांवर जवळपास २२५ मेट्रिकटन इफको, तर १५१ मेट्रिक टन कृभको युरिया खताचे वाटप करण्यात आले. नंदुरबार तालुक्यातील दोन ते अडीच हजार शेतकऱ्यांना ३७६ मेट्रिक टन युरिया खताचे वाटप या ठिकाणी सहा केंद्रांवरून करण्यात आले आहे. त्यातच कोपरली खोंडामळी, रनाळे, ईसाईनगर, नंदुरबार तसेच नंदुरबार शहरातील मार्केट यार्ड येथील भागात युरिया खताचे वितरण जिल्हा प्रशासनातर्फे शेतकी संघाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. नंदुरबार शहरात गेल्या दोन दिवसांपासून युरिया खताचे वाटप करून देखील बरेच शेतकरी हे खतापासून वंचित राहिले असून जिल्हा प्रशासनाकडे अजून जवळपास दोन हजार मेट्रिक टन खतांची आवश्‍यकता आहे. 

खतांबाबत नियोजन करावे : पाडवी 
नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की शेतकऱ्यांना बी-बियाणे व खतांसाठी शहरात यावे लागू नये यासाठी रेशन दुकानांच्या माध्यमातून कृषी निविष्ठा वितरित करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने करावे खतांच्या योग्य वापराविषयी शेतकऱ्यांना योग्य ती माहिती द्यावी युरियाच्या उपलब्धतेबाबत पालकमंत्री यांनी स्वतः कृषी मंत्र्यांशी चर्चा केली आहे. युरियाचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होईल असे देखील जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar fertilizer no avalabale district