ग्रामपंचायतीला पडला विसर; गृहरक्षक जवानाने कर्तव्य पारपाडत पाॅझेटिव्ह दांम्पत्याचे घर, परिसर केला निर्जंतुकीकरण

जसपाल वळवी
Tuesday, 26 January 2021

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. घराचे तसेच परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यास संबंधित विभागाने कुठलीही तसदी घेतली नाही.

वाण्याविहिर : अक्कलकुवा शहरांमधील भिम नगर परिसरातील एका कुटुंबातील दाम्पत्य गेल्या आठवड्यात कोरोना पॉझिटिव्ह झाल्यामुळे त्यांचे घर तसेच परिसर संबंधित विभागाने निर्जंतुकीकरण न केल्यामुळे तसेच कोणतीही खबरदारीची उपाययोजना करण्यासही अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे कोरोना पॉझिटिव दाम्पत्याचे घर तसेच परिसर गृहरक्षक दलाचे जवान सुनील झाल्टे यांनी स्वतः स्वखर्चाने घर व घराच्या परिसरात निर्जंतुकीकरण करून गृहरक्षक दलाचा मानवतेचा आदर्श समाजासमोर ठेवला.

आवर्जून वाचा - अमळनेरमध्ये प्रजासत्ताकदिनी संतप्त शेतकऱ्यांच्या उपोषणाने वेधले लक्ष 
 

अक्कलकुवा शहरातील भीम नगर परिसरातील एक दांपत्य गेल्या आठवड्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते या दाम्पत्याच्या परिवारात वयोवृद्ध तसेच बालकांचा समावेश असल्यामुळे भिती पससली होती कोरोना पॉझिटिव असलेल्या दाम्पत्याला सौम्य लक्षणे असल्यामुळे आवश्यक तो औषध उपचार करून आपल्या राहत्या घरातच विलगीकरण करण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. घराचे तसेच परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यास संबंधित विभागाने कुठलीही तसदी घेतली नाही.

कर्तव्याची जाण 

खबरदारीची उपाययोजना देखील करण्यात आली नसल्यामुळे या परिवाराच्या शेजारी राहणारे गृहरक्षक दलाचे जवान सुनील झाल्टे यांनी आपल्या मानवी कर्तव्याची जाण ठेवून आपला जीव धोक्यात घालून अक्कलकुवा पोलीस ठाण्यातून निर्जंतुकीकरण करण्यासाठी स्प्रे मशीन आणून स्वखर्चाने कोरोना पॉझिटिव असलेले दाम्पत्याचे घर तसेच परिसरात फवारणी केली. 

आवश्य वाचा- राज्यातील ग्रामीण भागातील पेयजलसाठी 13 हजार 668 कोटींचा आराखडा तयार !
 

प्रशासनाला पडला विसर

कोरोना महामारी च्या सुरुवातीला एखादा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास ग्रामपंचायत प्रशासनाकडून पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाचे घरासह घराच्या आजूबाजूच्या परिसर संपूर्णपणे निर्जंतुकीकरण केला जात होता. मात्र ग्रामपंचायतीमार्फत निर्जंतुकीकरणयाच्या नावावर लाखो रुपयांची उधळपट्टी केल्याचे पाण्यावर उघडकीस आले आहे.

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar home guard personnel performed duties