esakal | कांदा पिकावर मर, होमनी, करपा प्रादुर्भाव; शेतकरी चिंतेत
sakal

बोलून बातमी शोधा

Onion Crop

कांदा पिकावर मर, होमनी, करपा प्रादुर्भाव; शेतकरी चिंतेत

sakal_logo
By
योगिराज ईशी

कळंबू : कळंबूसह परिसरात कांदा पिकांवर (Onion Crop) मर, होमनी अळी व करपा रोगाच्या प्रादुर्भावाने (Disease) शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा या रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी (Farmers) वर्गात चिंता निर्माण झाली आहे.

हेही वाचा: पहिल्याच मुहूर्ताला कापसाला मिळाला सात हजारांचा भाव


कधी अनियमित पाऊस तर कधी अति पावसामुळे डोळ्यासमोर पिकांचे होणारे अतोनात नुकसान अशा विविध नैसर्गिक आपत्तींशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आता कांदा पिकाने लागवडीनंतर काही दिवसांतच डोळ्यात अश्रू आणल्याने शेतकरी वर्ग पुन्हा आर्थिक संकटात दिसून येत आहे. कांदा पीक हे तीन ते चार महिन्यांत निघते. मात्र योग्य भाव मिळेल याची हमी नाही, तरीही मोठ्या हिमतीने बागायती शेतकरी दरवर्षी कांदा पीक लागवड करतात. कांदा पिकाची जुलै ते ऑगस्ट दरम्यान खरीप हंगामात लागवड केली जाते. लागवडीसाठी महागडे कांदा रोप विकत घेऊन किंवा स्वतः च्या शेतात रोप लागवड करून कांदा रोप तयार केले जाते.
कळंबूसह परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने कांदा लागवड केली.

शेतकरी वर्गामध्ये चिंता

लागवडीपासून ते आत्तापर्यंत एकरी ३५ ते ४० हजार रुपये खर्च आला असून या पुढील उत्पन्न येथ पर्यंतचा खर्च यामध्ये विविध खते, फवारणी, निंदणी केली जाते. मात्र सध्या या पिकावर होमनी अळी, करपा व मर (बुरशीजन्य) रोगाने थैमान घातल्याने शेतकरी वर्गामध्ये चिंता दिसून येत आहे. महागडे खते व फवारणी करूनही या रागाचा नायनाट होत नसल्याने कांदा पीक निम्म्याहून अधिक वाया जात आहे. या रोगांमध्ये रोप खराब होणे, कांदा सडणे, मूळ कुज होणे, रोप पिवळी पडणे, कांदा पात सुकणे आधी लक्षणे जाणून येत आहेत. अति पावसामुळेच याचा प्रादुर्भाव होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यामुळे लागवड कांदा वाफे पूर्ण वाया जाण्याची भीती येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली. याची दखल घेऊन कृषी विभागाने भेट देऊन उपाययोजना सुचवावेत, असे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे.

हेही वाचा: धुळे महापौर निवडणूक:भाजपच्या कर्पेंना संधी;तर विरोधक विखुरलेलेच!


माझ्या शेतात २५० वाफे कांदा लागवड केली आहे. एक एकरामध्ये पेरणी पद्धतीने कांदा पीक घेतले आहे. आत्तापर्यंत विविध फवारणी करूनही या रोगाचा नायनाट होत नसल्याने, लागलेला खर्च वाया जाण्याची भीती आहे.
- गणेश माळी, कांदा लागवड शेतकरी, कळंबू, ता. शहादा

loading image
go to top