कोकण पट्ट्यातून येणारी 'मायनी गाडी'ची परंपरा कायम !

संपर्कातील इतर गावात जमिनीला स्पर्श नकारता फक्त गावात भेट देते
कोकण पट्ट्यातून येणारी 'मायनी गाडी'ची परंपरा कायम !

कळंबू : मानली तर श्रद्धा, नाही मानली तर अंधश्रद्धा हे सर्वांना अवगत आहे. असेच काही जुन्या चालरीतीची प्रथा कळंबू येथे पाहावयास मिळत आहे. गावातील, घरातील इडा पीडा टळो व सुख समृद्धी नांदो या उद्देशाने जुन्या रितिरिवाजानुसार (Tradition) मायेची गाडी अर्थात अहिराणी भाषेत (Ahirani language) ( मायनी गाडी ) ची परंपरा आजच्या युगातही येथे पाहावयास मिळत आहे. शहादा तालुक्यातील कळंबू येथे पुरातन पदमा भवानी मातेचे आकर्षक मंदिर आहे. येथे दरवर्षी आषाढ महिन्यात कोकण (Kokan) पट्ट्यातून मायची गाड़ीचे आगमन होत असते.

(konkan coming tradition gods continues)

कोकण पट्ट्यातून येणारी 'मायनी गाडी'ची परंपरा कायम !
तब्बल..३५ वर्ष आणि ते ही पुरुष सेवक चालवीत आहे अंगणवाडी

दोन वर्षांपासून सर्वत्र कोरोनाचे संकट वाढल्याने हे संकट टळण्यासाठी गेल्या वर्षापासून उन्हाळ्यातच भवानी मातेच्या मंदिरावर गाडीचे आगमन होत आहे. येथे मातेच्या मुक्कामी आगमनानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मातेची विधिवत पूजा करून भक्तीभावाने गावातील पोलिस पाटील, सरपंच व ग्रामस्थांच्या मदतीने पुढील संपर्कात येणाऱ्या गावात मातेची विल्हेवाट लावून जुन्या परंपरेला चालना देऊन श्रध्दा ठेवली जात आहे.

कळंबू येथे थांबते मुक्कामी
संपर्कातील इतर गावात जमिनीला स्पर्श नकारता फक्त गावात भेट देत शहादा तालुक्यातील कळंबू गाव पदमा भावना मातेचे माहेर गाव असल्याने येथे मुक्कामी थांबते हे जाणकारांकडून सांगण्यात आले. मुक्कानंतर येथे गावाच्या पोलिस पाटील, सरपंच गावकरी मार्फत गावातून वर्गणी गोळा करून विधिवत पूजा करुन पायी अथवा, मिळेल त्या साधनाने वाजतगाजत शहादा तालुक्यातील कहाटूळ गावाच्या शिवार पर्यंत मातेस पोहचवण्यास येते तेथून कहाटूळ ग्रामस्थांच्या मदतीने पुढे पोचवण्यात येते. असा क्रम संपर्कातील गावात ग्रामस्थांच्या मदतीने होतो.

कोकण पट्ट्यातून येणारी 'मायनी गाडी'ची परंपरा कायम !
'क्लस्टर’मधून जळगावच्या केळीला वगळले

मायेची गाडी म्हणजे काय..
एक पेक्षा अधिक जुन्या अथवा कोऱ्या टोपल्या, विविध टाकाऊ वस्तूमध्ये खराटा, झाडू, टोपली, लाल मिरची, कोंबडी, बोकड, कुंकू, हळद, ओढणी, बांगडी, आदी साहित्य एकत्र करून कोकण भागातून या गाडीची निर्मिती करून विविध संपर्कातील गावात नागरिकांच्या मदतीने हातोहात प्रवास करत धुळे जिल्ह्यातील निमगुळ, टाकरखेडा नंतर नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथून कळंबू, गोगापूर, दामळदा हुन थेट मध्येप्रदश व महाराष्ट्र दोन राज्याला लागून वसलेल्या कोचराई मातेच्या मंदिराशी मातेची सांगता होत असल्याचे जाणकारांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com