
धोरणात्मक बदल केल्यामुळे पेंशन धारकांना आता कोणत्याही महिन्यात डिजिटल लाइफ सर्टिफिकेट देता येऊ शकेल. ज्या महिन्यात सर्टिफिकेट देतील त्या महिन्यापासून पुढील एक वर्षापर्यंत ते ग्राह्य धरले जाईल.
शनिमांडळ (नंदुरबार) : एम्प्लॉईज पेंशन स्कीमअंतर्गत पेंशन घेणाऱ्या पेंशन धारकांना डिजिटल लाइफ सर्टिफिकेट (जीवन प्रमाणपत्र) द्यावे लागते. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात द्यावे लागणारे प्रमाणपत्र आता वर्षभरात कोणत्याही महिन्यात देऊ शकतात. कारण पीएफ कार्यालयाने त्यासंबंधीच्या निर्णयात धोरणात्मक बदल केला आहे.
धोरणात्मक बदल केल्यामुळे पेंशन धारकांना आता कोणत्याही महिन्यात डिजिटल लाइफ सर्टिफिकेट देता येऊ शकेल. ज्या महिन्यात सर्टिफिकेट देतील त्या महिन्यापासून पुढील एक वर्षापर्यंत ते ग्राह्य धरले जाईल. निवृत्तीनंतर कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार देण्यासाठी कर्मचारी निवृत्ती वेतन योजना 1995 आणि फॅमिली पेंशन योजना 1971 या योजना राबविण्यात येतात.
त्रास होणार कमी
पेंशनधारकांना दरवर्षी डिजिटल लाइफ सर्टिफिकेट द्यावे लागते. परंतु बायोमेट्रिक वेरीफिकेशन करताना त्याचे अंगठ्याचे ठसे जुळत नाहीत. आधारकार्डमध्ये काही दुरुस्त्या करायच्या आहेत; या कारणास्तव डिजिटल लाईट सर्टीफिकेट मिळविण्यासाठी विलंब लागतो. पेंशन धारकांना हेलपाटे मारावे लागतात. यातून पेंशनधारकांची सुटका होण्यासाठी आता वर्षभरात केव्हाही डिजिटल लाइफ सर्टिफिकेट देण्याची परवानगी देण्यात आली आहे.
लाइफ सर्टिफिकेट एक वर्षासाठी वैद्य
दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात बँका तसेच पीएफ कार्यालयात डिजिटल लाइफ सर्टिफिकेट जमा करण्यासाठी पेन्शनरयांच्या रांगा लागतात. त्यामध्ये बराच वेळ खर्ची पडतो, ही गर्दी टाळावी आणि पेंशनरांचा त्रास वाचावा. यासाठी पीएफ कार्यालयाने वर्षभरात केव्हाही डिजिटल लाइफ सर्टिफिकेट जमा करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे एखाद्या पेन्शनरांना चालू वर्षी जुलैमध्ये लाइफ सर्टिफिकेट जमा करुन दिले. तर पुढील वर्षी जुलैपर्यंत ते वैद्य राहील. अशी माहिती भविष्य निर्वाह निधी कार्यालय आयुक्त अरुण कुमार यांनी दिली.
संपादन ः राजेश सोनवणे