मेडिकल कॉलेज यंदा सुरू करू : मंत्री पाडवी  

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 25 January 2020

आदिवासी विकास विभागाच्या योजनांविषयी अधिकाऱ्यांकडून माहिती करून घेत आहे. त्यानंतर त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीविषयी काम सुरू करता येईल असे सांगून मंत्री पाडवी म्हणाले,‘ काही प्रकरणांविषयीही कायदेशीर माहिती जाणून घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल.

नंदुरबार : जिल्ह्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय यावर्षी सुरू करण्यासाठी पालकमंत्री म्हणून माझा शंभर टक्के प्रयत्न राहणार आहे. अनेक प्रश्‍न मार्गी लागले आहेत. प्रशासन व अधिकारी यांच्या समन्वयातून जिल्ह्याच्या विकासासाठी जे जे गरजेचे आहे, ते करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आदिवासी विकासमंत्री. के. सी. पाडवी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 
मंत्री श्री. पाडवी यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. श्री. पाडवी यांनी जिल्ह्यातील आदिवासीं विद्यार्थ्यांच्या महत्त्वाच्या डीबीटीच्या प्रश्‍नावरही अधिकारी-पदाधिकारींची बैठक घेत मार्ग काढण्यात येईल असे स्पष्ट केले. 

हेही वाचा - यांचा वशिला म्हणूनच आपण मंत्री : गुलाबराव पाटील 

आदिवासी विकास विभागाच्या योजनांविषयी अधिकाऱ्यांकडून माहिती करून घेत आहे. त्यानंतर त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीविषयी काम सुरू करता येईल असे सांगून मंत्री पाडवी म्हणाले,‘ काही प्रकरणांविषयीही कायदेशीर माहिती जाणून घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल. आदिवासी विकास विभागाच्या भ्रष्टाचारामध्ये अनेकांना दोषी ठरविले गेले आहे. त्याबाबतची माहिती जाणून घेऊन दोषींवर कारवाई होईलच. त्यात निष्पाप अधिकाऱ्यांचा बळी जाऊ नये, हेही पाहणे गरजेचे आहे. आश्रमशाळांना पुरविले जाणारे भरड धान्याचा दराविषयी विचारले असता काही धान्याला जास्त दर तर काहींना बाजारापेक्षा कमी दर आहे, या तफावतीबाबत सविस्तर माहिती मागविली आहे. 

ग्रंथालयासाठी सव्वा तीन कोटी 
नंदुरबार येथे व्हाईट हाऊस उभारण्यासाठी सव्वा तीन कोटीच्या निधीस डिपीडिसीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. त्यातून एक मोठे ग्रंथालय उभारण्याचे नियोजन असल्याचे श्री. पाडवी यांनी सांगितले. 

डिबीटीसाठी प्रयत्न करू 
आश्रमशाळामधील डिबीटीसाठी येत्या काही दिवसात माजी मंत्री, पदाधिकारी,अधिकारी यांची बैठक घेऊन त्यावर चर्चा केली जाईल. डिबीटीमुळे काही अडचणी निर्माण होत आहेत, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. काही ठिकाणी परिस्थितीच अनुकूल नाही, या साऱ्यांवर आपण स्वतः त्यासाठी सकारात्मक आहोत, त्यासाठी प्रयत्न केले जाईल असेही श्री. पाडवी यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar medical collage minister padvi press