मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकासह तिघांवर गुन्हा दाखल

वीज बिल न भरल्यामुळे महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा खंडित केला
crime
crimecrime



शहादा : शहरातील खेतिया रस्त्यावरील एका दुकानाचा खंडित केलेला वीज पुरवठा (Power supply) सुरळीत करण्याकरिता दुकान मालकाने वीज बिल भरून देतो असे सांगत बोलावले. मात्र, बिलाचा भरणा न करता दमदाटी करून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचाऱ्याला (MSEDCL employee) मारहाण व शिवीगाळ केली. या संदर्भात शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा (Crime at Shahada police station) दाखल करण्यात आला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक ( NCP Corporator) व त्यांचे दोन भाऊ अशा तिघांवर शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला. नगरसेवक फरार असून दोघा भावांना अटक केली आहे. ( msedcl employee beaten shahad ncp corporator crime)

crime
शेतकऱ्यांवर नवीन संकट; उसावर पांढरी माशीचा प्रादुर्भाव!

शहादा खेतीया रस्त्यालगत गरीब नवाज कॉलनीसमोर नगरसेवक वाहिद पिंजारी यांची भारत डेअरी आहे. दुकानाचे वीज बिल न भरल्यामुळे महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी संबंधितांचा वीज पुरवठा खंडित केला. सायंकाळी नगरसेवक वाहिद पिंजारी यांनी वीज कंपनीच्या कर्मचाऱ्याला भ्रमणध्वनीने संपर्क करून वीज बिल भरणा करतो असे सांगून बोलवण्यात आले. कर्मचारी तंत्रज्ञ सुनील हरी ठाकरे सायंकाळी दुकानाजवळ पोहोचल्यानंतर वीज बिल भरणा करा अशी मागणी केली असता नगरसेवक वाहिद पिंजारी यांनी वीज बिल भरणार नाही, तुम्ही वीज जोडणी करा अशी दमदाटी करू लागले. त्याच वेळेस नगरसेवक पिंजारी यांचे बंधू मन्नान पिंजारी व वासिम शेख तेली उर्फ तलवार हे आले. कर्मचाऱ्यांना वीज जोडणीसाठी दमदाटी व मारहाण करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच वीज कंपनीचे कनिष्ठ अभियंता सुजित पाटील घटनास्थळी पोहोचले.

crime
कुपोषित बालकांवर उपचारासाठी खडकी येथे बालोपचार केंद्र

नगरसेवक पिंजारी फरार
सायंकाळी उशिरा पोलिस ठाण्यात घटनेबाबत तंत्रज्ञ सुनील ठाकरे यांनी तक्रार दाखल केली. यात नगरसेवक व त्यांचे बंधू या तिघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा, जातिवाचक शिवीगाळ म्हणून गुन्हा नोंदविला आहे. दोन जणांना अटक केली असून नगरसेवक फरार आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नीलेश वाघ करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com