esakal | फसवणूक : शाळा अनुदानित असल्‍याचे भासवत गंडविले
sakal

बोलून बातमी शोधा

non granted school fraud

काही वर्ष विनावेतन काम करून घेऊन फसवणूक केली. याप्रकरणी त्यांचा वडिलांनी पोलिसात धाव घेतली आहे. त्यांनी दिलेल्या फियार्दीवरून दोघांविरूध्द उपनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फसवणूक : शाळा अनुदानित असल्‍याचे भासवत गंडविले

sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार : चोपडा (जि. जळगाव) येथील विधीज बहुउदेशीय फाऊंडेशन अंतगर्त एकलव्य प्राथमिक शाळा वनकुटे (ढंढाणे, ता.नंदुरबार) येथे सुरू करण्यात आलेल्या विना अनुदानित शाळेस अनुदानित असल्याचे भासवून संस्थेचे अध्यक्षासह एकाने येथील बहिण- भावाला नोकरीचे आमिष दाखवित साडेचार लाखात गंडविले. तसेच काही वर्ष विनावेतन काम करून घेऊन फसवणूक केली. याप्रकरणी त्यांचा वडिलांनी पोलिसात धाव घेतली आहे. त्यांनी दिलेल्या फियार्दीवरून दोघांविरूध्द उपनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

चोपडा (जि. जळगाव) येथील दीपक रघुनाथ पाटील याने विधीज बहुंउद्देशीय शैक्षणिक संस्थेतंगर्त वनकुटे (ता.नंदुरबार) येथे एकलव्य प्राथमिक विद्यालय सुरू केली. ती विना अनुदानित असतांनाही शाळा अनुदानित असल्याचे भासवून सुनिल विठ्ठलदास वसईकर या तरूणाकडून दीपक पाटीलने तीन लाख रूपये घेऊन लेटर पॅडवर त्यास नियुक्तीपत्र देऊन नोकरी दिली. तसेच त्यानंतर मनोज शंकर वसईकर (रा.चव्हाण चौक, नंदुरबार) याने सुनिल यांची बहिणीस त्या शाळेत स्वयंपाकीण म्हणून नोकरीला लावतो; असे सांगत दीड लाखाची रक्कम घेतली. असे दोन्ही बहिण-भावाकडून साडेचार लाख रूपये गंडविले. 

पगार मिळालाच नाही
दोन्ही भावंडे शाळेत दररोज जाऊन काम करत होते. मात्र त्यांना वेतन आज मिळेल, उद्या मिळेल असे दर महिन्यास आस होती. मात्र त्यांना वेतन मिळाले नाही. त्यांनी चौकशी केली असता शाळा विनाअनुदानित तत्वावर असल्‍याचे समजले. त्यामुळे त्यांना आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आले. खोटे बोलून साडे चार लाखही घेतले व एवढे दिवस विना मेहनताना काम केले. ही बाब बहिण-भावाने त्यांचा वडिलांना सांगितली. त्यानुसार त्यांचे वडिल विठ्ठलदास रामदास वसईकर यांनी उपनगर पोलिस ठाण्यात फियार्द दिली.त्यानुसार दीपक रघुनाथ पाटील (चोपडा) व मनोज वसईकर (नंदुरबार) या दोघांविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात मनोज वसईकर यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे