नंदुरबार : त्या अधिकाऱ्याचे अखं कुटुंब पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 13 June 2020

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या अहवालानुसार या सहाही जणांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलेले आहेत. हे अधिकारी कुटुंबियांसह बांधकाम विभागाच्या क्वार्टर मध्ये राहत होते.

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढत असून आज रात्री आलेल्या अहवालानुसार आणखी सहा जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. हे सर्व जण बांधकाम विभागातील त्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत. यामुळे नंदुरबार जिल्यानेही कोरोनाची पन्नाशी गाठली आहे.
आरोग्य यंत्रणेने दिलेल्या अहवालानुसार या सहाही जणांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलेले आहेत. हे अधिकारी कुटुंबियांसह बांधकाम विभागाच्या क्वार्टर मध्ये राहत होते. पॉझिटिव्ह आलेल्यात बाधित अधिकाऱ्याची 68 वर्षीय आई, 43 वर्षीय पत्नी,20 वर्षाचा मुलगा,15 वर्षाची मुलगी यांच्यासह त्यांच्या संपर्कात आलेली 31 वर्षीय महिला आणि 12 वर्षाची एक मुलगी आहे. यामुळे ते राहत असलेला परिसर सील करून तेथें फवारणी करण्यात आली आहे. हा परिसर आधीच कंटेन्मेंट झोन आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar officer all family member corona positive