नंदुरबारमध्ये एकाच दिवशी 10 कोरोना रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 14 June 2020

दहा रुग्णात नंदुरबार शहरातील लक्ष्मीनगर भागातील 58 वर्षीय महिला आणि 31 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. यामुळे आता एकूण बाधितांची संख्या आता 60 झाली आहे.

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढतवाढतच असून आज रात्री आलेल्या अहवालानुसार आणखी दहा जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात शहरातील जामा मशीद परिसरातील त्या रुग्णाच्या कुटुंबातील आरोग्य यंत्रणेने दिलेल्या अहवालानुसार 10 व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल रात्री आलेल्या अहवालानुसार पॉझिटीव्ह आले आहेत. 

कुटुंबातील पाच  व्यक्ती
जामा मस्जिद भागातील रुग्णाच्या कुटुंबातील पाच  व्यक्ती आहेत. तसेच जिल्हा रुग्णालय दोन कर्मचारी 42 वर्षीय महिला आणि 31 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. रनाळे येथील रुग्णांच्या कुटुंबातील 38 वर्षीय पुरुषाचाही समावेश आहे. या दहा रुग्णात नंदुरबार शहरातील लक्ष्मीनगर भागातील 58 वर्षीय महिला आणि 31 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. यामुळे आता एकूण बाधितांची संख्या आता 60 झाली आहे.

शहादा : कोरोना सदृश लक्षणे आढळल्याने मंदाणे येथील महिला व लोणखेडा येथील पुरूष या दोघांना जिल्हा सिव्हिल रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंदाणे गाव आज तातडीने सॕनिटाईज करण्यात आले असून तीन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.
मंदाणे येथील ५२ वर्षीय महिला अहमदाबाद येथून परतली होती. परवापासून तिची प्रकृती बिघडल्याने अगोदर खाजगी रुग्णालयात उपचार घेतले व आज मंदाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेली असता तिच्या निमोनियाची चाचणी घेण्यात आली. 

कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्याने तिच्या घरातील एका महिलेसह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे सदर महिलेला ॲडमिट करण्यात आले असून सोबतच्या महिलेला होम क्वारंटाईनची सूचना देण्यात आली आहे. तर लोणखेडा येथील ५३ वर्षीय पुरुष काही दिवसांपूर्वी मुंबईहून परतले होते कुटुंबीयांनी त्यांना होम क्वारंटाईन केले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar one day ten corona positive case detact