नंदुरबारच्या एका पोलिसाला कोरोनाची लागण 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 May 2020

पोलिस कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारे संरक्षणाचे साहित्य उपलब्ध नसल्याने कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण होत आहे. यात मालेगावमध्ये दोन दिवसांपुर्वी आठ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे.

नंदुरबार ः कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असून, कोरोनाशी लढा देणाऱ्या पोलिस कर्मचारी व आरोग्य कर्मचाऱ्यांना देखील याची लागण होत आहे. दोन दिवसांपुर्वी मालेगाव येथे आठ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची घटना असताना आज मालेगावला तैनात असलेल्या नंदुरबारच्या एका पोलिस कर्मचाऱ्याचा देखील अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. 
कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी पोलिस प्रशासन आणि डॉक्‍टर व आरोग्य कर्मचारी प्रत्यक्ष कोरोनाशी लढा देत आहेत. असे असताना त्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होत असून, पोलिस कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारे संरक्षणाचे साहित्य उपलब्ध नसल्याने कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण होत आहे. यात मालेगावमध्ये दोन दिवसांपुर्वी आठ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये देखील एक भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

नंदुरबारमधील एकास लागण 
मालेगाव येथे तैनात असलेल्या आठ पोलिसांना कोरोनाची लागण झाली असताना यात जळगावच्या दोन पोलिसांचा समावेश होता. तर आज पुन्हा एक पोलीस कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून, सदर पोलिस कर्मचारी नंदुरबार येथील आहे. हा कर्मचारी 13 एप्रिलला मालेगाव येथे बंदोबस्तासाठी गेला होता. 24 एप्रिलला परतल्यानंतर त्याला क्वॉरंटाईन करण्यात आले होते. इतर 56 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोविड-19 चा संसर्ग झालेल्या व्यक्तींची संख्या आता 18 झाली असून त्यापैकी इजा रुग्ण मृत्यू पावलेला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar one police malegaon duty and corona positive