esakal | ये आई मला अभ्‍यास करायचाय; मोबाईल दे ना
sakal

बोलून बातमी शोधा

online study

आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकरी कुटुंबात ॲड्राईड मोबाईल नाही. आता विद्यार्थ्यांना ७- ८ हजार रुपयापेक्षा जास्त किमतीचा मोबाईल घ्यावा की बियाणे, खते, फवारणी करावी या विवंचनेत शेतकरी आहेत. तर दुसरीकडे मुले पालकांकडे मोबाईलसाठी हट्ट करू लागले आहेत. 

ये आई मला अभ्‍यास करायचाय; मोबाईल दे ना

sakal_logo
By
योगीराज ईशी

कळंबू : ग्रामीणच नाही, तर शहरी भागातील विद्यार्थ्यांनाही ऑनलाइन अभ्यासक्रमासाठी मोठी धडपड करावी लागत आहे. तालुक्यातील बहुतांशी शाळांनी ऑनलाइन अभ्यासक्रमावर भर दिला आहे. मात्र, यातील अनेक विद्यार्थी हे मोबाईल नसल्यामुळे शिक्षणापासून वंचित रहात आहेत. ग्रामीण भागात सध्या कोरोना विषाणूने थैमान घातले असताना मार्चपासून सर्वसामान्याचे आर्थिक चक्र थांबले आहे. एप्रिल, मे च्या लॉकडाउन नंतर आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकरी कुटुंबात ॲड्राईड मोबाईल नाही. आता विद्यार्थ्यांना ७- ८ हजार रुपयापेक्षा जास्त किमतीचा मोबाईल घ्यावा की बियाणे, खते, फवारणी करावी या विवंचनेत शेतकरी आहेत. तर दुसरीकडे मुले पालकांकडे मोबाईलसाठी हट्ट करू लागले आहेत. 

कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी गेल्या चार पाच महिन्यांपासून तालुक्यात लॉकडाउनचे नियम लागू आहे. दरम्यान तालुक्यात अजुनही कोरोनाचा प्रार्दुभाव कमी व्हायचे नाव घेत नसल्याने प्राथमिक व माध्यमिक शाळा बंदच आहेत. काही शाळांनी ऑनलाईनचा पर्याय निवडून मुलांना शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. यात सर्व इंग्रजी माध्यमाच्या व अनेक मराठी माध्यमांच्या खासगी शाळांनी तसे अन्य लहान मोठ्या शाळांनी देखील ऑनलाईनचे धडे देण्यास सुरुवात केली खरी परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची मोबाईलमुळे आणि नेटवर्कमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. 

नेटवर्कमुळे अडचणी 
तालुक्यात मोबाइल कंपन्यांचे जाळे पसरले आहे. मात्र, अनेक भागात रेंज नसणे हा सर्वांत मोठा अडथळा विद्यार्थ्यांना ठरत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी मोबाइलची रेंज मिळवण्यासाठी गच्ची, गल्ली वा ज्या भागात रेंज आहे त्या भागातील विद्यार्थ्यांकडे जात आहे. 

ऑनलाइन अभ्यासक्रमात अनेक विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. यात मोबाइलची रेंज नसणे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पालकांकडे अँड्रॉइड मोबाइल नसणे, पालकांकडेच मोबाइल असल्याने ते कामानिमित्ताने बाहेर असल्याने मुलांना ऑनलाइन अभ्यासात अडथळे येतात. त्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांना या ऑनलाइन अभ्यासाला मुकावे लागत आहे. मात्र, यातून मार्ग काढत मुलांनी मोबाइल शेअरिंग करत का होईना शिकायला हवे. 
-नवल देवरे, . मुख्याध्यापक, जि. प. प्रा. शाळा ,कळंबू ता. शहादा

संपादन : राजेश सोनवणे

loading image