येथे झाला ना ‘अंडे का फंडा’; ऑनलाईन त्रिकुट आणि शेतकरी यांच्यातले काय आहे प्रकरण

धनराज माळी
Monday, 14 September 2020

शहादा तालुक्यातील वडाळी येथील तरुण शेतकरी कैलास निकम कुक्कुट पालनाच्या व्यवसाय वाढवण्यासाठी इंटरनेटवर शासनाच्या योजनांची माहिती घेत होता. त्याच दरम्यान, बिजनेस अपॉर्च्युनिटी या फेसबुक पेजवर व्यवसायिक कर्जासाठी मार्गदर्शन व माहितीसाठी राज भोसले नामक व्यक्तीच्या मोबाईल क्रमांक मिळाला.

नंदुरबार : कुक्कुटपालन व्यवसायासाठी कर्ज मंजुरीसाठी ४६ हजार रुपयांत तरुण शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या तिघांवर सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

नक्‍की वाचा- खडसेंनी ‘आर पार की लढाई’ लढावी ः गुलाबराव पाटील 
 

शहादा तालुक्यातील वडाळी येथील तरुण शेतकरी कैलास निकम कुक्कुट पालनाच्या व्यवसाय वाढवण्यासाठी इंटरनेटवर शासनाच्या योजनांची माहिती घेत होता. त्याच दरम्यान, बिजनेस अपॉर्च्युनिटी या फेसबुक पेजवर व्यवसायिक कर्जासाठी मार्गदर्शन व माहितीसाठी राज भोसले नामक व्यक्तीच्या मोबाईल क्रमांक मिळाला. या मोबाईल क्रमांकावर कैलास निकम यांनी व्हाट्सअपद्वारे संपर्क करून कुक्‍कूट पालनसाठी दहा लाख रुपये कर्ज लागणार असल्‍याचे सांगितले.

असा सुरू झाला खेळ
राज भोसले यांनी कैलास यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यांना कर्ज मंजुरीसाठी प्रोसेसिंग फी म्हणून २० हजार ८०० रुपये द्यावे लागतील; असे सांगितले असता राज भोसले यांनी २३ मार्च २०१९ ते ३० मार्च २०१९ या कालावधीत राहुल अजय चौधरी (रा. दोंडाईचा) यांच्या खात्यावर २१ हजार रुपये ‘फोन पे’ द्वारे पाठवली. त्यानंतर मोहित सातपुते याने त्याच्या मोबाइल क्रमांकावरून कैलास निकम यांच्याशी संपर्क साधून सिबिल वाढविण्यासाठी २५ हजार रूपये मला व साहेबांना द्यावे लागतील असे सांगून १० एप्रिल रोजी तुमच्या खात्यावर दहा लाख रुपये मिळून जातील असे सांगितले. यानंतर कैलास निकम यांनी ६  ते ८ एप्रिल २०१९ या कालावधीत २५ हजार रुपये राहुल अजय चौधरी याच्या खात्यात फोनपे द्वारे पाठवले.

मग उडवाउडवीचे उत्‍तर
पैसे जमा केल्यानंतर कर्जाच्या प्रतीक्षेत असलेले कैलास निकम यांनी राज भोसले, मोहित सातपुते व अजय चौधरी यांच्याकडे कर्जविषयी विचारणा केली. तिघांकडून अपेक्षित उत्तरे देण्यात आली नाही व कर्जाची कोणतीही रक्कम मिळाली नाही. तसेच फोनपेद्वारा भरलेली रक्कम देखील परत मिळाली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कैलास निकम यांनी म्हसावद पोलीस स्टेशन गाठून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात केला. पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे करीत आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar poultry business loan young boy online option and fraud case