चालकाच्या हुशारीमूळे चाळीस जणांचे वाचले प्राण, संपूर्ण ट्रॅव्हल बस जवळून राख

दिलीप गावीत
Monday, 16 November 2020

अचानक शॉर्टसर्किट होऊन धूर निघत असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आलंय त्यामुळे, चालकाने त्वरित बस थांबवली व बसमधील प्रवाशांना तात्काळ उतरविले.

विसरवाडी : धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर खाजगी बसमध्ये अचानक शार्ट सर्कीट होवून संपूर्ण बस जळून राख झाल्याची पहाटे घटना घडली. घटनेत बसचालकाच्या हुशारीमुळे बस मधील सुमारे चाळीस प्रवाशाचे प्राण वाचले आहे. 

विसरवाडी पासून आठ किलोमीटर अंतरावर धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर सोंनखांब गावाच्या निमदर्डा या फाट्यावर धुळे कडून सुरत कडेजाणारी खाजगी ट्रॅव्हल बस क्रमांकMh.40.At2929 हे जात असताना अचानक शॉर्टसर्किट होऊन धूर निघत असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आलंय त्यामुळे, चालकाने त्वरित बस थांबवली व बसमधील प्रवाशांना तात्काळ उतरविले.

प्रसंगावध लक्षात घेवून बस थांबवली

प्रवाशांना आग लागल्याचे लक्षात येताच आरडो ओरड केल्याने बस चालकाने तत्काळ प्रसांगावध लक्षात घेत बस थांबवली आणि सर्व प्रवाशींचे प्राण या बस चालकामुळे वाचले. यात सुदैवाने कोणाला काही ईजा झाली नाही. मात्र संपूर्ण बस जळून राख झाली.

पोलीसांचे आग विझवीण्यासाठी प्रयत्न 

बस जळत असताना विसरवाडी पोलीस व ट्रॅफिक पोलिसांच्या मदतीने अग्निबंबला पाचारण करण्यात आले मात्र काही उपयोग झाला नाही.व बस पूर्ण जळून खाक झाली. त्यामुळे बसचे मोठे नुकसान झाले आहे सोमवारी पाहटे तीन वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar private bus was burnt to ashes at Visarwadi