राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. मोरे की तांबोळी ? 

abhijit more sagar tamboli
abhijit more sagar tamboli

नंदुरबार : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्षपद गेल्या पाच महिन्यापासून रिक्त आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसची वाटचाल सध्या बिना सारथीचा रथा प्रमाणे सुरू आहे.सध्या जिल्हाध्यक्ष निवडीबाबत वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष डॉ. अभिजित मोरे व विद्यमान अध्यक्ष सागर तांबोळी हे दोन्हीही इच्छुक आहेत. त्यामुळे दोघांकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. मोरे की तांबोळी ? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. त्यामुळे कार्यकर्तेही संभ्रमात पडले आहेत. 

गेल्या सहा वर्षापासून जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व कमी झाले आहे. माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची कार्यकर्त्यांची फळी त्यांच्यासोबतच भाजपमध्ये दाखल झाली आहे. मात्र त्यानंतर राजेंद्रकुमार गावित यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची धुरा सांभाळली. ते जिल्हाध्यक्ष झाले. त्यांच्यासोबतीला माजी आमदार शरद गावितासंह राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सागर तांबोळी , महिला जिल्हाध्यक्षा हेमलता शितोळे, राजेंद्र पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते पक्षनिष्ठा ठेवून काम करत राहिले. मात्र पाच महिन्यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित यांनी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने जिल्ह्यात एकही जागा न सोडल्याने नाराज होत राजीनामा दिला. सत्तेत भाज पक्षाचे वर्चस्व असतांना पक्षाला जिवंत ठेवण्याचे काम राजेंद्रकुमार गावित यांनी केले. त्यासाठी अनेक कार्यक्रम , उपक्रम राबवून सर्वसामान्य जनतेचे प्रश्‍न सोडविले. त्यासाठी पदरमोडही त्यांना करावी लागली. त्यांचा बरोबरीने सागर तांबोळी व हेमलता शितोळे यांनी पक्षाचे काम जोमात सुरू ठेवले. मात्र राजेंद्रकुमार गावित यांच्या राजीनामानंतर पक्षाची धुरा सागर तांबोळी व हेमलता शितोळे यांनी सांभाळली. जिल्हा परिषद , विधानसभा निवडणुकीतही त्यांनी पक्षाची धुरा पेलली. त्यावेळी त्यांनीही पक्ष कार्यासाठी व कार्यकर्त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आर्थिक झळही सोसली. 

जिल्हाध्यक्षपदासाठी हालचाली सुरू 
सध्या जिल्हाध्यक्षपदासाठी हालचालींना वेग आला आहे. गेले काही वर्ष राजकारणापासून अलिप्त राहिलेले राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांनी दोन महिन्यापूर्वी जिल्हा परिषद निवडणुकांचा दरम्यान पक्षात पुन्हा सक्रिय झाले. ते सक्रिय झाले तरी पक्षीय जबाबदारी व निवडणुकांची जबाबदारी सागर तांबोळी, हेमलता शितोळे,माजी आमदार शरद गावित यांनी पार पाडली. युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष असतांना सर्व जबाबदाऱ्या पेलल्याने सागर तांबोळी यांना जिल्हाध्यक्षपद मिळावे असा आग्रह त्यांचा कार्यकर्त्यांचा सुरू झाला आहे. त्यातून तांबोळी यांचीही इच्छा प्रकट झाली आहे. असे असतांना मात्र डॉ. अभिजित मोरे यांनीही जिल्हाध्यक्षपदासाठी प्रयत्न सुरू केल्याचे बोलले जात आहे. 
पक्ष निरीक्षकांचा बैठकीत अनेक अनुपस्थित नुकतीच मागील आठवड्यात पक्ष निरीक्षक नाना महाले व माजी आमदार अनिल गोटे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्या बैठकीचे नियोजन डॉ. अभिजित मोरे यांनी केले होते. त्यामुळे आत्तापर्यंत पक्षाची एकनिष्ठ असलेले व कार्यरत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद गावित, सागर तांबोळी, हेमलता शितोळे, राजेंद्र पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते त्या बैठकीत दिसले नाहीत. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदावरून गटा-तटाचे राजकारण सुरू झाल्याचे स्पष्ट दिसते. 

कामाला प्राधान्य की पक्षीय वजनाला महत्त्व 
दरम्यान, जिल्हाध्यक्षपदासाठी सागर तांबोळी व डॉ. मोरे हे इच्छुक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये डॉ. मोरे हे अनेक वर्ष पक्षापासून लांब होते. अचानक दोन महिन्यापूर्वी पुन्हा पक्षीय कामाला सुरुवात केली. लागलीच जिल्हाध्यक्षपद त्यांना मिळत असेल तर तो सागर तांबोळी अथवा इतर दुसरा एकनिष्ठ सक्रिय कार्यकर्त्यांवर होणारा अन्याय असेल, अशा भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होतांना दिसत आहेत. मात्र तांबोळी हे आत्तापर्यंत सक्रिय काम करीत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत जिल्हाध्यक्षपदाची भूमिका निभावली आहे. पडतीचा काळात तेच पक्षाला चिकटून होते. त्यामुळे त्यांचा त्या कामाला न्याय मिळेल की, डॉ. अभिजित मोरे यांचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी असलेले कौटुंबिक संबंधांतून असलेल्या त्यांचा राजकीय वजनाला प्राधान्य दिले जाते. याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com