esakal | रस्ता बंद..म्हणून पतीने खांद्यावर पत्नीला उचल्ले, पण वाटेतच मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Woman Death

रस्ता बंद..म्हणून पतीने खांद्यावर पत्नीला उचल्ले, पण वाटेतच मृत्यू

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नंदुरबार ः जिल्ह्यातील सातपुडा (Satpuda) पर्वत रांगातील अतिदुर्गम भागातील धडगाव तालुक्यातील चांदसैली घाटात दरड कोसळल्याने (Landslide) रस्ता बंद झाला. या परिसरातून गंभीर स्थितीत असलेली एक महिला वेळेत दवाखान्यात (Hospital) पोहचू शकली नाही म्हणून तिचा रस्त्यातच मृत्यू (Woman Death) झाल्याची घटना घडली. दरड कोसळ्याने घाट रस्ता बंद असल्याने पतीने पत्नीला खांद्यावर उचलून रस्ता पार केला मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला. रस्तामूळे वेळेत पोहचू शकली नाही

नंदुरबारमधील चांदसौली येथे मुसळधार पावसात दरड कोसळली. दरड कोसळल्यामुळे या परिसरातील घाट रस्ता बंद झाला आणि परिणामी नागरिकांना शहराकडे जाण्यासाठी पायी मार्गच शिल्लक राहीला नाही. दरड कोसळल्यामुळे धडगावकडून तळोदाकडे येणारी रुग्णवाहिका घाटात अडकली होती. या रुग्णवाहिकेतील सिदलीबाई पाडवी ही महिलेच्या पोटात तिव्र वेदना होत होत्या. रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते मात्र, रस्ताच बंद असल्याने शेवटी त्यांच्या पतीने आपल्या खांद्यावर टाकून पायपीट सुरू केली.

Woman Death

Woman Death

वाटेतच मृत्यू..

उपचारासाठी येत असलेल्या सिदलीबाई पाडवीचा रस्ता बंद असल्याने पतीने खांद्यावर घेत दवाखान्यात पायवाटेने निघाले. परंतू सिदलीबाईचा रस्त्यातच दुर्देवी अंत झाला आहे. या महिलेचा वेळेवर उपचार न मिळाल्याने रस्त्यातच मृत्यू झाला.

हेही वाचा: धुळे महापालिका..ठेकेदारांवर भलतीच उदार

अतिदुर्गम भागाकडे प्रशसानाचे दुर्लक्ष

नंदुरबार जिल्ह्याला सातपुडा पर्वंत रांगा असून येथे अनेक दुर्गम परिसर आहे. परंतू नंदुरबार जिल्हा प्रशासनाच्या तोकड्या आरोग्य व्यवस्थेमूळे अनेक बळी दुर्गम भागातील नागरिकांचा जीव जात आहे. त्यातच वेळेत उपचार मिळाला नाही म्हणून आज एका महिलेचा बळी गेला आहे. अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या सोयी सुविधांकडे प्रशासनाचे नेहमीच दुर्लक्ष होत असल्याचा आरोप येथील नागरिकांकडून होत आहे.

Landslide

Landslide

रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू..

तळोदा - अक्राणी मार्गांवरील चांदसैली घाटामध्ये पहाटेच्या सुमारास 100 मीटर भागात दरड कोसळली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांकडून दरड काढण्याचे काम सुरु आहे. सायंकाळी उशिरापर्यंत दरड हटविण्याचे काम पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सांगण्यात आले आहे. पोलीस, महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत.

loading image
go to top