esakal | आरटीओ कार्यालये होणार डिजिटल 
sakal

बोलून बातमी शोधा

rto office work in digital

आरटीओमध्ये फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे राज्यातील सर्वच आरटीओ मधील खिडक्यांवरील गर्दी आता कमी होणार आहे. काही तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर येत्या दहा दिवसात ई-सहीला सुरुवात होईल.

आरटीओ कार्यालये होणार डिजिटल 

sakal_logo
By
नीलेश पाटील

शनिमांडळ (नंदुरबार) : राज्यातील सर्व आरटीओ डिजिटल करण्याच्या पहिल्या टप्प्याला अखेर दसऱ्यापासून सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात डुबलीकेट लायसनचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये वाहनचालकांना संबंधित कागदपत्रे ऑनलाइन सादर करण्याची व्यवस्था केल्याने आरटीओमध्ये फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे राज्यातील सर्वच आरटीओ मधील खिडक्यांवरील गर्दी आता कमी होणार आहे. 
काही तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर येत्या दहा दिवसात ई-सहीला सुरुवात होईल. त्यामुळे राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन विभागामध्ये संपर्क विरहित कारभाराची सुरुवात होईल. यामुळे कोरोनाच नव्हे, मात्र इतर वेळीही वाहनचालक आणि नागरिकांच्या वेळेची आणि पैशांची बचत होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे भ्रष्टाचारालाही आळा घालण्यास परिवहन विभागाला यश मिळेल, अशी माहिती राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी दिली. 

घरबसल्‍या परवाना नक्‍कल काढता येणार
श्री. ढाकणे यांनी सांगितले, की पहिल्या टप्प्यात दुचाकी आणि चारचाकी वाहनचालक परवान्याची (ड्रायव्हिंग लायसन) नक्कल प्रत काढताना आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करण्याची सुविधा करण्यात येईल. यात अनेक वेळा वाहन चालकांचे परवाने (लायसन्स) खराब झाल्यानंतर किंवा हरवल्यानंतर त्यांना दुसऱ्या प्रतीसाठी आरटीओमध्ये यावे लागते. मात्र, ही सेवा सुरू झाल्यानंतर वाहनचालकांना घरबसल्या वाहनचालक परवाना याची नक्कल प्रत काढता येणार आहे. नक्कल प्रत काढताना आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करून नियमाप्रमाणे शुल्काचा भरणाही डिजिटल पद्धतीने भरण्याची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. परिणामी, लायसन्सची नक्कल प्रत वाहनचालकांना घरपोच मिळणार आहे. टप्प्याटप्प्याने आरटीओतील सर्व कामकाज डिजिटल झाल्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातील लाखो वाहनचालकांच्या वेळेची बचत होणार आहे. 

आधार कार्ड लिंक आवश्यक 
डुबलीकेट लायसन्सपासून वाहन नोंदणीपर्यंत सर्व प्रकारची कागदपत्रे भविष्यात वाहनचालकांना ऑनलाइन पद्धतीने अपलोड करता येणार आहेत. त्यामुळे आरटीओमधील गर्दीत पन्नास टक्क्यांहून अधिक संख्येने कमी होईल. फक्त ऑनलाइन कागदपत्रे अपलोड करण्यासाठी अर्जदारांना त्यांचा मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक करावा लागेल. जेणेकरून ऑनलाइन कागदपत्रे सादर केल्यानंतर डिजिटल सहीसाठी एक ओटीपी आधारकार्डशी लिंक मोबाईल क्रमांकावर पाठवला जाईल. अर्जदाराने ओटीपी टाकल्यानंतर संबंधित कागदपत्रे सारथी किंवा वाहन या दोघींपैकी संबंधित सव्हरवर अपलोड करता येणार आहे.  

संपादन ः राजेश सोनवणे