esakal | पंतप्रधान व मुख्‍यमंत्री भेटीचे राजकारण नको : संजय राऊत
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay raut

पंतप्रधान व मुख्‍यमंत्री भेटीचे राजकारण नको : संजय राऊत

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नंदुरबार : मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra modi) यांची भेट घेतली. यात मुख्‍यमंत्र्यांनी महाराष्‍ट्रातील काही प्रलंबित असलेल्‍या मुद्यांवर पंतप्रधानांसोबत चर्चा केली. मात्र त्‍यांच्‍या या भेटीची वेगळीच चर्चा केली जात असून, शिवसेना भाजपसोबत येण्याबाबत काहींच्‍या अपेक्षा वाढल्‍या आहेत. मात्र पंतप्रधान व मुख्‍यमंत्रींच्‍या भेटीचे राजकारण करण्याची गरज नसल्‍याचे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Shiv sena leader sanjay raut) यांनी आज येथे स्‍पष्‍ट केले. (nandurbar-sanjay-raut-shiv-sena-meet-and-tour-on-khandesh)

शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे खानदेश दौऱ्यावर असून आज (ता.११) नंदुरबार जिल्‍ह्यात आले असताना शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक झाल्‍यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राऊत म्‍हणाले, की मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्‍त्‍वाचा आहे. परंतु या संदर्भात आता राज्याची भुमिका राहिली नाही; हा मुद्दा सोडविण्यासाठी आता जे काही करायचे आहे, ते केंद्रालाच करावे लागणार आहे. हाच प्रमुख मुद्दा मांडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र यांची भेट घेतली. परंतु या भेटीला वेगळे वळण दिले जात आहे.

हेही वाचा: साडेतीन वर्षे हिंदुत्वावरच जोर देणार : संजय राऊत

वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा

चंद्रकांत पाटलांची काल वाढदिवस होता. त्यांनी जास्त केक खालला असेल. शिवसेना हा पिंजऱ्यातला वाघ आहे, आम्‍ही पिंजऱ्यात बसलो आहोत. पिंजऱ्याचा दरवाजा उघडा ठेवला असून त्यांना मी पिंजऱ्यात येण्याचे आमंत्रण देतो. त्‍यांनी पिंजऱ्यात येवून दाखवावे व हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावुन दाखवा.

पालकमंत्रींनी अडचण असल्‍यास मांडा

नंदुरबारचे पालकमंत्री के. सी. पाडवी असून ते शिवसेनेच्‍या पदाधिकाऱ्यांना विरोध करतात कामे होवू देत नाही. असे मुद्दे शिवसेनेच्‍या पदाधिऱ्यांनी राऊत यांच्‍याजवळ बैठकीत मांडले होते. याबाबत बोलताना राऊत यांनी पालकमंत्री म्‍हणून संघर्ष करण्यात वेळ घालविपेक्षा कामे करण्यात लक्ष द्यावे. मंत्रालयात काही अडचण येत असल्‍यास पालकमंत्र्यांचे काही काम असल्‍यास आम्‍हाला सांगा मदत करून प्रश्‍न सोडविण्यास तयार असल्‍याचे राऊत यांनी सांगितले.