पोलिस पाटलांना आता कलम ३५३ चे संरक्षण; राज्यगृह विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय   

पोलिस पाटलांना आता कलम ३५३ चे संरक्षण; राज्यगृह विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय   

शनिमांडळ : गाव पातळीवर पोलिसांचा प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या पोलिस पाटलांना आता इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच कलम 353 चे संरक्षण मिळणार आहे.कर्तव्य बजावत असताना पोलीसपाटील यांना मारहाण झाल्यास सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा आता संबंधित आरोपींविरुद्ध दाखल केला जाणार आहे. राज्याच्या पोलिस महासंचालकांनी याबाबतच्या सूचना सर्व पोलीस ठाण्यांना दिल्या आहेत.त्यामुळे पोलिस पाटलांना सरकार कडून मोठा दिलासा मिळाला आहे.
 

पोलीसपाटील हा सरकारचा शेवटचा प्रतिनिधी म्हणून गाव पातळीवर कार्यरत असतो.गावातील कायदा व सुव्यवस्था राखणे ही महत्त्वाची जबाबदारी ही पोलीस पाटलांवर असते.पोलीस आणि जनता यांच्यामधील दुवा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.अशा परिस्थितीत कर्तव्य बजावत असताना पोलीसपाटील यांना मारहाण झाल्याच्या घटना घडतात.अशा दोषींविरुद्ध कडक कार्यवाही करणे जरुरीचे असते.आत्तापर्यंत पोलीसपाटील सरकारी नोकरी या व्याख्येत बसत नव्हते.राज्यातील पोलिसपाटलांची याबाबत अनेक वर्षांची मागणी होती.जून 2018 मध्ये कलम 353 मध्ये सुधारणा करण्यात आल्या.त्या पोलीसपाटलांना ही लागू करण्याची मागणी होती.

पोलिसपाटलांना ३५३ चे संरक्षण 

पोलीसपाटील संघटनेच्या विविध मागण्यांसाठी 3 डिसेंबर २०२२ रोजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या समवेत बैठक झाली होती. या बैठकीत पोलीस पाटलांना मानधन वाडीसह संरक्षण देण्याचा मुद्दाही होता.पोलीस पाटलांना कर्तव्य बजावत असताना मारहाण झाल्यास संबंधितांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा कलम 353 नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी संघटनेने केली होती.त्यानुसार कलम 353 मध्ये सात जून 2018 रोजीच्या अधिसूचनेनुसार करण्यात आलेला सुधारणांचा आधार घेत,पोलिसपाटलांना 353 असे संरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
 

पोलीस पाटलांना मारहाण झाल्यास अजामीनपात्र गुन्हा
पोलीसपाटील हे लोकसेवक ठरत असल्याने कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर हल्ला झाल्यास हे स्वरक्षण देता येऊ शकते. त्यामुळे यापुढे पोलीस पाटलांना मारहाणीच्या घटना घडल्यास आरोपींविरुद्ध कलम 353 प्रमाणे अजामीनपात्र गुन्हा दाखल करावा.अशा सूचना पोलिस महासंचालकांनी सर्व पोलिस ठाण्यांना दिल्या आहेत.या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करावी,असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.गृह विभागाने 12 फेब्रुवारी रोजी पोलिस महासंचालकांना याबाबतचे आदेश दिले.त्या आदेशानुसार पोलीस महासंघसंचालकांनी सर्व पोलीस अधीक्षक,सर्व पोलीस आयुक्त यांना नुकतेच याबाबतचे पत्र दिले आहे.एकूणच गावपातळीवर काम करणाऱ्या पोलीस पाटलांना यामुळे मोठा दिलासा मिळाला असून राज्यस्तरीय संघटनेच्या पाठपुराव्याला यश आले आहे.लोकसेवक म्हणून यामुळे पोलीस पाटलांची जबाबदारी आता वाढली आहे.

सरकारच्या निर्णयाने आम्हाला काम करण्याची नवी वरचा मिळणार आहे व गावातील वाद हे सामंजस्याने मिटवण्यासाठी नवी ऊर्जा या निर्णयाने मिळाली आहे आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो

-रमेश पवार,पोलीसपाटील शनिमांडळ  
 

नेर

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com