केंद्र सरकारचा शिवसेनेतर्फे निषेध; दानवेंच्या पुतळ्याचे दहन 

धनराज माळी
Saturday, 12 December 2020

अक्कलकुवा येथे जिल्हाप्रमुख आमशा पाडवी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. शेतकऱ्यांचा अवमान केल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा निषेध करीत प्रतिकृतीचे दहन केले. 

नंदुरबार : पेट्रोल, डिझेल व महागाई विरोधात केंद्र शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला आहे. तसेच शेतकरी आंदोलन विरोधात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्याबद्दल शिवसेनेतर्फे नंदुरबार शहरासह जिल्हाभर निषेध आंदोलन केले. 

नंदुरबार येथे जिल्ह्याचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्‍या मार्गदर्शनाने जिल्हाप्रमुख डॉ. विक्रांत मोरे यांच्या नेतृत्वाखाली जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख रवींद्र गिरासे, ग्रा. सं. क. जिल्हाप्रमुख मनोज चव्हाण, जिल्‍हा परिषद उपाध्यक्ष राम रघुवंशी, नगरसेवक प्रवीण गुरव, मनिष बाफना, अर्जुन मराठे, रवींद्र पवार, दीपक दिघे, शहरप्रमुख राजधर माळी, तालुका संघटक जगदीश पाटील, पंडित माळी, उपतालुकाप्रमुख सागर मराठे, तसेच सर्व शाखाप्रमुख, शिवसैनिकांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला. 

अक्कलकुवा येथे पुतळा दहन 
अक्कलकुवा येथे जिल्हाप्रमुख आमशा पाडवी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. शेतकऱ्यांचा अवमान केल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा निषेध करीत प्रतिकृतीचे दहन केले. 

नवापूरला तहसीदाराना निवेदन 
नवापूर येथील शिवसेना कार्यकर्त्यांनी रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचे निषेध करून शेतकऱ्यांची मागणी मान्य करावी. या मागणीसह महागाई कमी करण्याबाबत केंद्र शासनाला तहशीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी देवका पाडवी, रमेश गावित, हसमुख पाटील, अनिल वारूडे, दिनेश भोई, गोविंद मोरे, राहूल टिभे, प्रवीण ब्रम्हे, मनोज बोरसे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

शहादा येथे आंदोलन 
केंद्र शासनाने कृषी विधेयक कायदा रद्द करावा यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना खलिस्तानवादी अतिरेकी म्हणून संबोधणारे त्याचप्रमाणे या आंदोलनाला चीन व पाकिस्तान पैसा पुरवत असल्याचा दावा करणाऱ्या केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, तसेच पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीविरोधात निषेध आंदोलन शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अरुण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. उपजिल्हाप्रमुख सखाराम मोते, उपजिल्हा संघटक मधुकर मिस्त्री, शहर प्रमुख रोहन माळी, तालुका संघटक भगवान अलकारी, शहर संघटक गणेश चित्रकथे, उपतालुका प्रमुख उत्तम पाटील, डॉ. सागर पाटील, बापू सूर्यवंशी, माजी नगरसेवक विनोद चौधरी, बापू चौधरी, दिलीप पाटील, सुरेश मोरे, गुलाब सुतार, प्रवीण सैंदाणे आदी सहभागी झाले होते. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar shiv sena protests against the central government