गडचिरोलीत सेवा बजाविणार्‍या नंदूरबारच्या जवानाचा हृदयविकाराने मृत्यू

धनराज माळी
Wednesday, 30 December 2020

जवान दिपक गायकवाड यांच्या मृत्यूची बातमी गावात कळताच गावावर शोककळा पसरली. तर गायवाकड कुटूंबाचा आक्रोश हदय पिळवीणारा होता.

नंदुरबार :  गडचिरोेली येथे सेवा बजावणार्‍या नवापूर तालुक्यातील नावली मोग्राणी येथील एसआरपीएफ जवानाचा काल (ता.२९)  हृदयविकाराने मृत्यू झाला. आज सकाळी   जवानाचे पार्थिव मोग्राणी गावात दाखल होत असून अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

नवापूर तालुक्यातील मोग्राणी येथील दिपक लक्ष्मण गायकवाड (32) हा एसआरपीएफ मध्ये सन 2014 साली भरती झाले होते. काल सकाळी गडचिरोली येथे सेवा बजावत असतांना दिपक लक्ष्मण गायकवाड याचा हृदयविकाराने दुर्दैवी मृत्यू झाला. दिपक गायकवाड याचा मृत्यू झाल्याची वार्ता काल सायंकाळी 10 वाजता येताच परिवारासह गावावर शोककळा पसरली. गडचिरोली येथून कै. दिपक गायकवाड याचे पार्थिव आज सकाळी मोग्राणी गावात दाखल होत असून त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. कै. दिपक गायकवाड यांच्या पश्‍चात आई, वडील, लहान भाऊ, बहिण असा परिवार आहे.

 

गावावर शोककळा 

जवान दिपक गायकवाड यांच्या मृत्यूची बातमी गावात कळताच गावावर शोककळा पसरली. तर गायवाकड कुटूंबाचा आक्रोश हदय पिळवीणारा होता. अंत्यविधीसाठी नातेवाईक व गावातील ग्रामस्थांनी अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे.

 

तीन महिन्यापूर्वी गडचिरोलीला बदली

जवान दिपक लक्ष्मण गायकवाड यांनी ८ सप्टेंबर 2014 साली सेवेत दाखल झाले होते. दौंड, कोल्हापूर या ठिकाणी सेवा दिल्यानंतर तीन महिन्यापूर्वी  गडचिरोली येथे सेवेत दाखल झाले होते.

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar soldier dies heart attack