पाऊस नसल्याने 5 एकर कापूस पिकावर फिरवला वख्खर

Nandurbar News : समाधानकारक पाऊस झाला नाही आणि जमिनीतील पाणीपातळी कमी झाली तर ऊस पीक देखील संकटात येईल अशी चिंता त्यांना सतावू लागली आहे.
Farmer
Farmer


तळोदा: तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे मोड येथील शेतकऱ्याला (Farmers) पाच एकर कापूस पिकावर वखर फिरवावा लागला. पावसाच्या लहरीपणामुळे मशागतपासून ते खते व बी- बियाणांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. अशीच गत तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम (Kharif season) पावसाअभावी (Rain) संकटात आला आहे. ऑगस्ट महिना सुरू झाला, तरी जोरदार पाऊस नसल्याने भूगर्भातील साठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पुढील काळात कूपनलिका किती तग धरतात, यावर शेती अवलंबून राहणार आहे. त्यात शेती कशी (Cotton Crop)करावी, या चिंतेत बळीराजा आहे.

Farmer
ऊजैनवरून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोन जणांचा मृत्यू


तालुक्यातील मोड येथील शेतकरी प्रवीणसिंग राजपूत यांचे खरवड शिवारात शेत आहे. या शेतात पाच एकर क्षेत्रावर जुलै महिन्याचा शेवटी आलेल्या पावसावर त्यांनी महागडे बियाणे आणून कापसाची लागवड केली होती. त्यात पिकाची उगवण तर झाली मात्र उगवण कमी अधिक प्रमाणात झाली तसेच त्यानंतर पावसाने दडीच मारल्याने उगवलेल्या कापूस पिकाची वाढ खुंटली. वाढच खुंटल्याने पाच एकर वरील कापूस पीक त्यांना औत लावून काढून टाकावे लागले आहे. त्यामुळे त्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यात कापूस पीक काढून तेथे पुढील काळात ऊस लावण्याचे नियोजन शेतकऱ्याचे आहे. मात्र समाधानकारक पाऊस झाला नाही आणि जमिनीतील पाणीपातळी कमी झाली तर ऊस पीक देखील संकटात येईल अशी चिंता त्यांना सतावू लागली आहे. त्यामुळे भविष्यात पाऊस कसा होतो त्यावरच पुढील नियोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

समाधानकारक पाऊस नाही..
दुसरीकडे मागील वर्षी पाच ऑगस्ट दरम्यान नदी नाले ओसंडून वाहू लागले होते. मात्र यावर्षी पावसाने संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण केली आहे. पुढील काळात पाऊस आला नाही तर काय होईल अश्या विवंचनेत शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
त्यात तळोदा तालुक्यातील शेती ही पूर्णपणे कूपनलिकेच्या अर्थात भूगर्भातील पाण्यावर अवलंबून आहे. पाऊसच कमी झाला तर सुरू असलेल्या कूपनलिका देखील बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यात समाधानकारक पाऊस नसल्याने तालुक्यातील पाचही लघुप्रकल्प कोरडेच आहेत. त्यामुळे जमिनीतील पाणीसाठा टिकण्यासाठी महत्वाचे असणारे रोझवा, गढवली, पाडळपूर, धनपूर, सिंगसपूर प्रकल्प भरण्याची व जोरदार पाऊस पडण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागून आहे.

Farmer
पावसाने दडी मारल्याने जळगाव जिल्ह्यात खरीप हंगाम संकटात

पाऊस समाधानकारक होईल, या आशेवर कापूस पिकाची पेरणी केली होती. मात्र, पावसाने दडी मारल्याने कापसाची वाढ झाली नाही. त्यामुळे पिकावर वख्खर फिरवावा लागला आहे. भविष्यात समाधानकारक पाऊस झाला नाही, तर कूपनलिका किती तग धरतील, यावर सर्व काही अवलंबून राहणार आहे. त्यामुळे पावसाचा लहरीपणामुळे शेती करणे अडचणीचे झाले आहे.
-प्रवीणसिंग राजपूत, शेतकरी, मोड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com